breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला सुरक्षा संदेश रॅलीला प्रतिसाद

पिंपरी – मागील पंधरा वर्षांच्या काळात राष्ट्रवादी कॉंग्रेसने पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगिण क्षेत्रात विकास केला. त्याचे श्रेय इतरांनी घेऊ नये. स्व:ता काही करायचे नाही आणि राष्ट्रवादीने केलेल्या विकास कामांची उद्‌घाटने करुन श्रेय लाटण्याचा प्रयत्न कराण्याचा भाजपाचा निषेध करीत ‘होय हे आम्हीच केलय!’ असा आणि महिलांच्या सुरक्षेचा संदेश देत पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने रविवारी (दि. 22) रॅली काढली.

 

भोसरीतील शिवसृष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हवेत तिरंगी फुगे सोडून रॅलीस सुरुवात झाली. यावेळी माजी महापौर ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम, डॉ. वैशाली घोडेकर, माजी महापौर मोहिनी लांडे, राष्ट्रवादीच्या आजी माजी नगरसेविका, महिला कार्याध्यक्षा पुष्पा शेळके, शहर संघटिका कविता खराडे, भोसरी विधानसभा अध्यक्षा मनिषा गटकळ, चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षा पौर्णिमा पालेकर, उपाध्यक्षा डिगा माधवन, शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष विजय लोखंडे, फझल शेख आदींसह राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्या बहुसंख्येने उपस्थित होत्या. भोसरीतून सुरु झालेल्या रॅलीचा पुढे संत तुकाराम नगर, भक्ती-शक्ती चौक मार्गे जाऊन बास्केट ब्रिज येथे समारोप करण्यात आला.

 

समारोप प्रसंगी राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर म्हणाल्या की, मागील वर्षात शहरात महिलांवरील अत्याचारात वाढ झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी, शाळा, महाविद्यालय परिसरात तरूणींची छेडछाड करण्याचे प्रकार वाढले आहेत. महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. याकडे शासनाचे व पोलीस यंत्रणेचे लक्ष वेधण्यासाठी ‘महिलांच्या सुरक्षिततेबाबत सेफ्टी ऑडीट रॅली’ काढण्यात आली आहे. तसेच, मागील पंधरा वर्षात राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात पिंपरी-चिंचवड शहराचा नियोजनबद्ध सर्वांगीण विकास केला आहे. पिंपरी-चिंचवड मध्ये रस्ते, उद्याने, रुग्णालय, नाशिक फाटा येथे दुमजली उड्डाण पुल,  आवश्यक तेथे पूल व ग्रेड सेपरेटर, गरिबांसाठी घरे, खेळाडूंसाठी बहुउद्देशीय क्रिडा संकुल, सांस्कृतिक सभागृह, शिवसृष्टी, संत शिल्प, नाट्यगृह उभारून शहराचा सर्वांगीण विकास राष्ट्रवादीच्या काळात झाला आहे हे शहरातील जाणकार नागरीकांना माहित आहे. या विकास प्रकल्पांचे श्रेय घेण्याचा भाजपा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. अशी टिका काळभोर यांनी यावेळी केली.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button