breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्वाईन फ्लू रुग्णाच्या उपचारासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आत्तापर्यंत 20 जणांचा बळी गेला असून आरोग्य वैद्यकीय विभाग अद्याप गाफील आहे. स्वाईन फ्ल्यू संसर्गजन्य आजार असून त्याचे उपचार खर्चिक आहेत. त्यामुळे पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णावर उपचार करण्यासाठी स्वतंत्र कक्ष सुरु करा, अशा सुचना स्थायी समितीच्या सदस्य विलास मडेगिरी यांनी आरोग्य वैद्यकीय अधिका-याला दिल्या आहेत.  

या सभेच्या स्थायी समिती सभापती सभापती ममता गायकवाड अध्यक्षस्थानी होत्या.  हवेतील गारव्यामुळे ‘स्वाईन फ्लू’चा प्रार्दुभाव वाढत आहे. गेल्या नऊ महिन्यात 20 जणांचा बळी गेला आहे.  गेल्या चार दिवसात तब्बल सहा जणांचा स्वाईन फ्ल्यूने मृत्यू झाला आहे. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर, शहरातील विविध खासगी रुग्णालयात सुमारे 200 ते 300 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दुभाव वाढत असून तो रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात. जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना स्थायी समितीच्या सदस्यांनी केल्या आहेत.

विलास मडिगेरी म्हणाले, ‘स्वाईन फ्ल्यूचा प्रार्दुभाव वाढत आहे. हा आजार संसर्गजन्य असून त्याच्यावरील उपचार  खर्चिक आहेत. रुग्ण जगला पाहिजे यासाठी पालिकेने प्रयत्न करावे. त्यासाठी महापालिकेच्या वायसीएमएच्‌ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात यावा’, अशा सूचना दिल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button