breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘आयआरबी’ विरोधात लढा उभारणा-या कामगारांना शिवसेनेचा पाठिंबा

पिंपरी, (महाईन्यूज) – मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग ‘आयआरबी’ कंपनीचा ठेका संपत असल्याने या ठिकाणी काम करणाऱ्या तालुक्यातील स्थानिक कामगारांच्या नोकरीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या कामगारांना शिवसेनेने जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग निर्मितीपासून स्थानिक भुमिपुत्र आयआरबी कंपनीकडे कामाला आहेत. कंपनीचा ठेका बंद झाल्यानंतर कामगारांच्या कामावर गडांतर येणार असल्याने कामाची शाश्वती मिळावी. नवीन ठेकेदार आल्यास कामगारांना कामावर कायम ठेवावे. या मागणीकरिता कालपासून स्थानिक १७९ कामगारांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तरी, आज शिवसेना मावळ तालुक्याच्या वतीने आंदोलन करणाऱ्या कामगारांची भेट घेऊन शिवसेना सदैव तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे. असा विश्वास देऊन तुमच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी तुमच्याबरोबर लढा उभा करणार आहे. तसेच, कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा देखील आयआरबी कंपनीला शिवसेनेने दिला आहे.

याप्रसंगी शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, शिवसेना महिला आघाडी पुणे जिल्हा संघटक शादान चौधरी, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, सभापती शरद हुलावळे, उपतालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, मदन शेडगे, तालुका समन्वयक बाळासाहेब फाटक, विभाग संघटक एकनाथ जांभूळकर, युवा सेना उपजिल्हाप्रमूख गिरीश सातकर, चिटणीस विशाल हूलावळे, नितिन देशमुख, विभागप्रमुख काळुराम हुलावळे, अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष हेमंत मेणे, शिव वाहतूक सेना उपजिल्हाध्यक्ष पंकज खोले, सरपंच सुनील येवले, उपशहरप्रमुख संजय भोईर, क्रुष्णा शीलवने, चंद्रकांत गाडे, महेश पिंगळे, मनीष पवार, प्रसिद्धीप्रमुख विजय आखाडे, महिला आघाडी उपशहर संघटक प्रतिभा कालेकर, विभागप्रमुख संजय शिंदे,  उपविभागप्रमुख रवींद्र टाकळकर, शाखाप्रमुख जितेंद्र ठोंबरे,  महिला आघाडी शाखा संघटक उर्मिला शर्मा आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button