breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कोरोना व्हायरस पसरवण्यात वुहान शहरच कारणीभूत – WHO

कोरोना विषाणूचा प्रसार होण्याबाबत चीन आणि इतर देशांमध्ये सुरू असलेल्या वादादरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने अखेरयावर आपले मत मांडले आहे. ते म्हणले की कोरोनाचा प्रादुर्भाव होण्यात चीनची प्रमुख भूमिका होती. त्यांनी स्पष्ट केले की कोरोना विषाणूचा प्रसार होण्यात चीनचे वुहान शहर हे एक मोठे कारण बनले आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्ल्यूएचओ) चे खाद्य सुरक्षा ज्युनोटिक व्हायरस तज्ज्ञ डॉ. पीटर बेन अंब्रेक यांनी शुक्रवारी जिनिव्हा येथे पत्रकार परिषद घेत सांगितले की वुहानच्या बाजारपेठेची यामध्ये भूमिका आहे, हे स्पष्ट आहे परंतु यात अधिक काय भूमिका आहे? याबाबत अधिक संशोधन आवश्यक आहे. ते म्हणाले की हा विषाणू या शहरात कोठून आला आहे किंवा विषाणू या बाजारपेठेत निर्माण झाला गेला हा संशोधनाचा विषय आहे. परंतु हा प्रश्न नक्कीच उद्भवतो की कोरोना विषाणूच्या प्रसारामध्ये शहराची भूमिका आहे. तसेच याबाबत अधिक संशोधन चालू असल्याचेही मत त्यांनी मांडले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button