breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सौर उर्जा विद्युत निर्मीती प्रकल्पासाठी सायन्स पार्क आणि अल्फा लावल यांच्यात सामंजस्य करार

पिंपरी, (महाईन्यूज) – मोठ्या उद्योगगृहांच्या सामाजिक जबाबदारीच्या (सीएसआर) माध्यमातून व सामाजिक बांधिलकीच्या जाणीवेतून पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क येथे सुर्यापासुन मिळणा-या उर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती करण्याचा अभिनव ४० कि. वॉट क्षमतेचा सोलार प्रकल्प राबविण्यात येणार आहे. हा प्रकल्प शहरातील अल्फा लावल प्रा. लिं. कंपनी राबविणार असून कंपनी आणि सायन्स पार्क यांच्यात आज शुक्रवारी (दि. 19) सामंजस्य करार करण्यात आला.

अल्फा लवाल कंपनीच्या वरिष्ठांशी चर्चा करून सीएसआर माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यास कंपनीची मंजुरी घेण्यात आली आहे. सामंजस्य करारानुसार अल्फा लवाल कंपनी सायन्स पार्कमध्ये ४० कि. वॉ. क्षमतेचा सोलार पॉवर प्रकल्पाची उभारणी करून वीज निर्मिती सुरु करणार आहे. तीन वर्षापर्यंत प्रकल्पाच्या देखभालीची जबाबदारीही घेणार आहे.

या प्रकल्यामुळे सायन्स पार्कला लागणारी बहुतांशी वीजेची गरज भागणार आहे. वीजबीलापोटी होणा-या प्रतिमहा सुमारे ६० हजार रुपयांच्या खर्चात बचत होईल. सायन्स पार्क ही स्वायत्त संस्था असल्याने कोणतेही आर्थिक अनुदान मिळत नसल्याने व सदर संस्था किमान खर्चात चालविली जात असल्याने आर्थिकदृष्ट्या हा प्रकल्प विशेष लाभदायी ठरणार आहे. तसेच, दरवर्षी सुमारे दोन लाख प्रेक्षक सायन्स पार्कला भेट देतात. या प्रेक्षकांनाही सोलार विद्युत प्रकल्पाची उपयुक्तता व आवश्यकता यांचे महत्व समजून घेता येणार आहे. तसेच, याव्दारे प्रतिवर्ष कार्बन फुट प्रिंन्टची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे. या प्रकल्पास सुमारे ३० लाख पर्यंत खर्च अपेक्षित आहे.

सामंजस्य करार करतेवेळी महापालिकेचे सहशहर अभियंता प्रविण तुपे, अल्फा लवाल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनंत पद्नाभन, लिगल उपाध्यक्ष निशान्त श्रीवास्तव, सीएसआरचे मॅनेजर ललिता वासू, संपर्क अधिकारी देवेन्द्र बिराजदार, सायन्स पार्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावळे, शिक्षण अधिकारी नंदकुमार कासार, सहशिक्षणाधिकारी सुनिल पोटे उपस्थित होते. मनपाचे सीएसआर विभागाचे अधिकारी विजय वावळे यांनी सांमजस्य कराराच्या कार्यक्रमाचे संचालन केले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button