breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

मराठा आरक्षण, सोलापूर 100 टक्के बंद ; वाहतूक सेवा विस्कळीत

सोलापूर –  मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सोलापूर शहरात सोमवारी बंद पाळण्यात आला़. या बंदला १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून काही आंदोलनकर्त्यांनी केलेल्या दगडफेकीमुळे आंदोलनाला हिंसक वळण लागले. या बंदमूळे सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवेने बससेवा, एसटी सेवा, खासगी वाहतुक बंदने सर्वसामान्यांच्या प्रवासाचे दिवसभर हाल झाले आहेत.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने सोमवारी सोलापूर बंदची हाक दिली होती़. सकाळपासूनच शिवाजी चौकातील दुकाने, हॉटेल्स १०० टक्के बंद ठेवण्यात आली होती़ शहरातील शिवाजी चौक, डफरीन चौक, कन्ना चौक, जुळे सोलापूर, आसरा चौक, सात रस्ता, पार्क चौक, विजापूर वेस, राजेंद्र चौक, जोडबसवण्णा चौक, अशोक चौक, बोरामणी नाका, मार्केड यार्ड परिसर, दयानंद महाविद्यालय परिसर, सम्राट चौक, छत्रपती संभाजीराजे चौक, बाळीवेस, टिळक चौक, नवी पेठ आदी परिसरातील दुकाने, व्यापा-यांनी बंदमध्ये सहभाग नोंदविला़ यामुळे शहरात दिवसभर शुकशुकाट दिसत होता़.  सकाळपासूनच शिवाजी चौकातील दुकाने, हॉटेल्स, एसटी सेवा, बस सेवा, खासगी वाहने, रिक्षा, टमटम आदी वाहतुक १०० टक्के बंद ठेवण्यात आली होती़. त्यामुळे नोकरदार, सर्वसामान्यांना या ठिकाणाहुन त्या ठिकाणी जाण्यासाठी मोठी गैरसोय झाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button