breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अहमदाबादमधील ऑटोरिक्षा चालवणारी पहिली दिव्यांग तरुणी…

अहमदाबाद | महाईन्यूज |

महिलांना ऑटोरिक्षा चालवताना, कॅब चालवताना किंवा बस चालवताना आपण नेहमीच बघतो..आण त्या महिलांबद्दल एक आदराची भावना निर्माण होते. पण काही असेही लोक आहेत जे या महिलांना त्यांच्या कामावरून जज करतात. कारण आजही हे काम केवळ पुरूषांचं समजलं जातं. पण या विचाराला छेद देत कितीतरी वेगळ आणि अभिमानास्प करून दाखवलं आहे अहमदाबादमध्ये राहणा-या अंकिताने. .

अंकिता शाह ही अहमदाबादमध्ये ऑटोरिक्षा चालवते एवढच नाही तर,अहमदाबादमधील ती पहिली दिव्यांग रिक्षावाली आहे. एका कॉल सेंटरमधील आपली आरामदायी नोकरी सोडून अंकिता गेल्या तीन महिन्यांपासून रिक्षा चालवतीये. हा निर्णय अंकिताने तिच्या कॅन्सर पीडित वडिलांच्या उपचारासाठी घेतला आहे.

अकिंता घरातील सर्वात मोठी मुलगी असून तिने अर्थशास्त्रातून पदवी मिळवली आहे. बालपणीच पोलिओने तिला शिकार केले त्यामुळे तिचा उजवा पाय कापावा लागला. अंकिता २०१२ मध्ये अहमदाबादला आली आणि कॉल सेंटरला नोकरी करू लागली होती. ‘१२ तासांची शिफ्ट केल्यावर मला मोठ्या मुश्कीलीने १२ हजार रूपये मिळायचे. मात्र वडिलांना कॅन्सर झाल्याचं कळालं तेव्हा तिला अहमदाबादहून सुरताला जावं लागायचं आणि सुट्टया घेण्यातही अडचणी येत होत्या. पैसेही जास्त मिळत नव्हते. त्यामुळे अंकिताने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर इतरही काही कंपन्यांमध्ये ती इंटरव्ह्यू देऊन आली मात्र तिला हवी तशा पगाराची नोकरी मिळत नव्हती. कंपन्यांसाठी तिचं दिव्यांग असणं जास्तच अडचणीचं होतं. ‘तो काळ फारच त्रासदायक असल्याचं अंकिताने सांगितलं. घर चालवणं कठिण होत होतं आणि वडिलांच्या उपचारासाठी मदत करता येत नसल्याचं वाईटही वाटत होतं. त्यामुळे अंकिताने अखेर तिच्या भरोश्यावर ,हिंमतीवर काहीतरी करून दाखवण्याचा निर्णय घेतला. तेव्हा अंकिताने रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला..

रिक्षा चालवण्याचा निर्णय अंकितासाठी सोपा तर नव्हताच, सोबतच तिच्या परिवारासाठीही सोपा नव्हता. पण आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी अंकिताने काम आणि खाजगी जीवनात बॅलन्स ठेवण्यासाठी हा निर्णय घेतला. ती रिक्षा चालवणं मित्रांकडून आणि लालजी बारोट यांच्याकडून शिकल्याचं ती सांगते. लालजी बारोट हे दिव्यांगही होते आणि रिक्षाही चालवत होते. त्यांनी अंकितालाही रिक्षा चालवणं शिकवलं तर, सोबतच कस्टमाइज्ड रिक्षा मिळवून देण्यासही मदत केली’.आता अंकिता ८ तास रिक्षा चालवते आणि महिन्याला २० हजार रूपयांपर्यंत कमाई करते. अंकिताला भविष्यात टॅक्सी बिझनेस सुरू करण्याची इच्छा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button