breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थापत्यच्या ‘मलईदार’ खुर्चीमुळे अधिका-याने पदोन्नतीचा अतिरिक्त पदभार नाकारला

सेवाज्येष्ठता यादीनूसार होता पदोन्नती प्रथम क्रमांक, पण ‘त्या’ दुस-याला अधिका-यांला मिळाली बढती

पिंपरी|महाईन्यूज|विकास शिंदे|

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचा स्थापत्य हा मलईदार विभाग आहे. या विभागातून दरवर्षी सरासरी एक ते दीड हजार कोटी रुपये वार्षिक खर्च होता. त्या विभागातून अन्यत्र बदली करण्यास पालिका अधिका-यांचा कायम नकार घंटा असतो. त्यामुळे स्थापत्यच्या एका अधिका-यांने अतिरिक्त पदभार असलेली पदोन्नती डावलली आहे. यामुळे मलईदार खुर्ची सोडून महापालिकेची प्रामाणिक सेवा बजाविण्यास अधिका-यांचा नकार येवू लागल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

महापालिकेच्या प्रशासन विभागाने नुकत्याच बदल्या व अतिरिक्त पदभार देत पदोन्नती दिलेल्या आहेत. त्यात काही मुख्य लिपिकांना कार्यालयीन अधिक्षक, मुख्य लिपिक, उप मुख्य लेखापाल पदावर बढत्या दिलेल्या आहेत. तर काहींना कार्यालयीन कामकाजाच्या सोयीनूसार बदल्या देखील केलेल्या आहेत. मात्र, त्यातील स्थापत्यच्या एका वरिष्ठ अधिका-यांना अतिरिक्त पदाचा पदभार नाकारला आहे. त्यांनी प्रशासन विभागास पत्र देवून विनंती केली आहे. स्थापत्य विभागाचा कामाचा अतिरिक्त ताण आहे. तसेच महापालिका आर्थिक वर्षाचे बजेचे काम सुरु आहे. त्यामुळे अतिरिक्त पदभार सांभाळून मूळ पदाचे काम करता येणार नाही. त्यामुळे मला अतिरिक्त पदाचे पदभार देण्यात येवू नये, या कामाचा अतिरिक्त ताणामुळे मला दोन्ही पदे सांभाळता येत नसल्याचा खुलासा पत्राद्वारे संबंधित अधिका-याने प्रशासनाकडे केला आहे.

त्यामुळे त्या खालोखाल सेवाज्येष्ठता यादीनूसार महापालिकेच्या प्रशासन विभागाने क्रमांक दोनच्या अधिका-यांला अतिरिक्त पदाचा पदभार देवून पदोन्नती दिलेली आहे. या पदोन्नतीमुळे सेवाज्येष्ठता यादीतील अन्य कर्मचा-यांनी प्रशासनावर नाराजी दर्शविली असून आम्ही प्रामाणिकपणे काम करुनही मागासवर्गीय आहे म्हणून आम्हाला डावलल्यांची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button