breaking-newsराजकारण
दिल्ली जिंकण्यासाठी अमित शाह रात्री दोन-दोन वाजेपर्यंत घेतायत बैठका
दिल्ली | महाईन्यूज
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आता भाजपाच्या अध्यक्षपदी नसले तरी, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावर त्यांचे अत्यंत बारीक लक्ष केले आहे. दिल्ली जिंकण्यासाठी अमित शाह पूर्ण जोमाने प्रचार करताना दिसत आहेत. अमित शाह रोड शो शिवाय दिवसाला तीन ते चार सभा संबोधित करत आहेत. मतदारसंघनिहाय पदाधिकारी, समन्वयक यांच्या रात्री दोन वाजेपर्यंत पक्ष कार्यालयात बैठका घेत आहेत.
प्रचार कसा सुरु आहे, जनमताचा कौल कुठल्या दिशेला आहे ते जाणून घेत आहेत. पहिल्या सभेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी अन्य दैनंदिन कामकाजांमध्ये व्यस्त झाले असून, अमित शाह यांनी दिल्लीच्या प्रचाराची सूत्रे आपल्या हाती घेतलेली आहेत. शेवटच्या टप्प्यात मोदी प्रचारात उतरणार की, नाहीत ते लवकरच दिसेल.