breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेत फूड बँकासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोरोनाच्या संसर्गामुळे संपूर्ण जगच हादरून गेलं आहे… अमेरिकेत तर कोरोनाचं थैमान वाढतच चाललं आहे. कोरोनाचा संसर्ग अमेरिकेतील सर्वच ५० राज्यांमध्ये झाला आहे. अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत १४ हजारांहून अधिकजणांचा मृत्यू झाला आहे. तर, ४ लाख ३५ हजारजणांना करोनाची बाधा झाली आहे.कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अमेरिकेतील परिस्थिती चिंताजनक झाली आहे. अमेरिकेतील काही भागांमध्ये नागरिकांना दोनवेळेस खाणे मिळवणेही कठीण झाले आहे. खाद्य पदार्थांच्या शोधासाठी अनेक हजारोजण वाहने घेऊन बाहेर पडली आहेत. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांच्या लाबंचलांब रांगा दिसत आहेत.

अमेरिकेतील पेन्सिलवेनिया राज्यातील एका फूड पॅन्ट्रीमध्ये किमान १०० जणांच्या अन्नाची व्यवस्था केली जाते. एकाच दिवसात अन्नासाठी तिथे जवळपास ९०० जणांनी अन्नासाठी रांग लावली होती. त्यामुळे परिस्थिती किती बिकट होत चालली आहे, याचा अंदाज करता येऊ शकतो. अशीच परिस्थिती अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनसह अन्य राज्यांमध्ये आहे. परिस्थिती इतकी बिघडली की, खाद्य पदार्थांचे पॅकेट्स वितरीत करण्यासाठी सुरक्षा रक्षकांना बोलवावे लागत आहे.

कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झालेल्या राज्यांमध्ये खाद्यान्नांची मागणी अप्रत्यक्षपणे वाढत असल्याचे समोर आले आहे. संकटातील या काळात फूड बँकांना दुहेरी संकट झेलावे लागत आहे. एकीकडे लोकांकडून कमी प्रमाणात अन्नाचा पुरवठा होत आहे. तर, दुसरीकडे हे अन्न वाटप करण्यासाठी स्वयंसेवक मिळत नाही. त्यामुळे फूड बँकांना नॅशनल गार्डची मदत घ्यावी लागत आहे. नॅशलन गार्डचे जवान गर्दी नियंत्रणासह फूड बँकांना संरक्षण पुरवत आहेत.

फूड बँकेच्यावतीने देण्यात येणाऱ्या फूड पॅकेट्समध्ये विविध खाद्यपदार्थांचा समावेश आहे. यामध्ये चिकन नूडल्स सूप, टुना मासा, पोर्क, बीन्स आदींचा समावेश आहे. ग्रेटर बेटन फूड बँकेचे अधिकारी माइक मॅनिंग हे मागील १६ वर्षांपासून फूड बँकेसाठी काम करत आहेत. अन्नासाठी एवढी गर्दी याआधी आपण कधीच पाहिली नसल्याचे त्यांनी सांगितले. फूड बँकासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याचे चित्र आहे. फूड बँकेजवळ आता निधीची कमतरता भासत असल्याची परिस्थिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button