breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#War Against Corona : भोसरी गाव तीन दिवस ‘सील’; आमदार महेश लांडगे भावूक

– दि.१०, ११ आणि १२ एप्रिल तीन दिवस भोसरी पूर्ण ‘सील’

– जीवनाश्यक वस्तुची दुकानेही बदं, महापालिका प्रशासनाचा निर्णय

पिंपरी । महाईन्यूज । प्रतिनिधी

जगभरात कहर माजवलेल्या कोरोना विषाणुने आपल्या उंबरट्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये धडक दिली आहे. सध्या शहरात २२ रुग्ण आहेत. त्यातील काही भोसरी परिसरातील आहेत. हा विषाणु अनेकांच्या जीवाला धोका करणार आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने भोसरी गाव तीन दिवस ‘सील’करण्यात येणार आहे. त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार आणि भाजपाचे शहराध्यक्ष महेश लांडगे भावूक झाले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत भोसरीकर सोशल डिस्टंसिंग पाळतील. महापालिका आरोग्य यंत्रणा सक्षम आहे. पोलिस प्रशासन चांगले काम करीत आहे. नागरिकही अन्य शहरांच्या तुलनेत सकारात्मक सहकार्य करीत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरराज्यात पहिल्यांदा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास आमदार लांडगे यांना होता. मात्र, दुर्दैवाने शहरातील रुग्णांच्या संख्यत वाढ होताना दिसते. विशेष म्हणजे, भोसरी गावठाण बंद करण्याचा निर्णय झाल्यानंतर आमदार लांडगे भावूक झाले आहेत.

          भोसरी परिसरात देखील कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे नागरिकांकडून खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी भोसरीकरांनी एकमताने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भोसरीगाव शुक्रवार, शनिवार आणि रविवारी पूर्ण  लॉकडाऊन करण्यात येणार आहे. या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

दरम्यान, शहरात 10 मार्चपासून  आजपर्यंत 22  रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बारा बरे झाले आहेत. 10 सक्रिय बाधित रुग्णांवर वायसीएम रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचार सुरु आहेत. महापालिकेने खबरदारी म्हणून शहरातील काही भाग सील देखील केला आहे. आता भोसरी गावठाणसुद्धा दि.१०, ११ आणि १२ एप्रिल २०२० रोजी पूर्णपणे बंद राहणार आहे.

घरीच रहा…सतर्क रहा…सुरक्षित रहा…!

आमदार महेश लांडगे म्हणाले की, जगभारात थैमान घातलेला कोरोना विषाणुने आता भोसरीत दाखल झाला आहे. कोरोनाबाधित काही संशयित रुग्ण असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे प्रशासनाने भोसरी सील करण्याचा निर्णय घेतला आहे. संचारबंदीची अंमलबजावणी कडक होणार आहे. आपल्या सर्वांच्या सुरक्षेसाठीच दि.१०, ११ आणि १२ एप्रिल २०२० असे तीन दिवस भोसरी गाव पुर्णपणे सील करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहिले पाहिजे…आणि विशेष म्हणजे घरीच राहिले पाहिजे. भोसरीतच बालपण आणि राजकीय कारकीर्द घडवलेल्या आमदार लांडगे यांचा गावठाण आणि भोसरीशी विशेष जिव्‍हाळा आहे. त्यामुळे उभ्या आयुष्यात भोसरी बंद होईल, असे कधी वाटले नाही, अशा शब्दांत आमदार लांडगे यांनी भावनांना वाट मोकळी करुन दिली.

प्रशासनाला सहकार्य करुया…कोरोनाला हद्दपार करुया…

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे. पुढील तीन दिवस भाजीपाला, किराणा माल, दूध पुरवठा सारख्या जीवनावश्यक वस्तुंची दुकानेही पूर्णपणे बंद ठेवली जाणार आहेत. त्यामुळे तमाम ग्रामस्थ, नागरिक आणि दुकानदार यांनी या जागतिक महामारीला घरात घुसू द्यायचे नाही. आपण घरी राहिलो…तरच ‘सोशल डिस्टंसिंग’पाळले जाणार आहे. प्रत्येकाने आपआपली काळजी घेतली पाहिजे. कुणीही घराबाहेर पडू नका…ही कळकळीची विनंती आहे. आपणप्रशासनाला सहकार्य करुया; कोरोनाला हद्दपार करुया..! असे आवाहनही आमदार लांडगे यांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button