breaking-newsमनोरंजन

‘लस्ट स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित

नेटफ्लिक्सने आपला तिसरा भारतीय सिनेमा ‘लस्ट स्टोरी’चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या सिनेमात चार वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या कहाण्या एकत्रित दिसणार आहेत. यामध्ये, करण जोहर, अनुराग कश्यप, झोया अख्तर आणि दिबाकर बॅनर्जी दिग्दर्शित चार कहाण्यांचा समावेश आहे. यामध्ये राधिका आपटे, आकाश ठोसर, भूमी पेडणेकर, विक्की कौशल, कियारा आडवानी, मनीषा कोयराला, संजय कपूर यांसारखे कलाकार दिसणार आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, ‘सैराट’फेम आकाश ठोसर याचा हा पहिलाच हिंदी सिनेमा ठरणार आहे. या सिनेमातील आकाशचा लूकही प्रेक्षकांसाठी आकर्षक ठरत आहे. या कहाण्यांमध्ये राधिका एका महाविद्यालयीन प्रोफेसरच्या भूमिकेत दिसत आहे. ही कथा अनुराग कश्यपनं दिग्दर्शित केली आहे . तर भूमी पेडणेकर एका नोकरानीच्या भूमिकेत आहे. ती आपल्या मालकाच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे. ही कथा झोया अख्तर हिने दिग्दर्शित केली आहे. तर करण जोहर दिग्दर्शित कथेत कियारा आडवानी, विक्की कौशल आणि नेहा धुपिया दिसतात. चौथ्या कथेचं दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केलंय… या कथेत मनीषा कोईराला, संजय कपूर आणि जयदीप अहलावत यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button