breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनिल देशमुख आणि नवनीत राणा यांच्यासह १६ जणांची निर्दोष मुक्तता

अमरावती – लोकसभा निवडणूक २०१९ या काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल देशमुख आणि नवनीत कौर राणा यांच्यासह १६ जणांना दोष मुक्त केले.

खासदार नवनीत राणा यांचा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह १६ जणांवर अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये भादंवि कलम १८८ अंतर्गत आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्यावर निर्णय देताना जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ.ए. देशपांडे यांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले. फिर्यादी पक्षाने याप्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षाने केलेली याचिका न्यायालयाने रद्दबातल ठरवत सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नवनीत कौर राणा यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थन मिळाले होते. नवनीत कौर राणा यांनी भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. यावेळी विद्यमान गृहमंत्री अनिल देशमुख, यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी नवनीत कौर यांनी आदर्श आचारसंहीतेचा भंग केल्याची तक्रार पोलिसांत दाखल झाली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button