breaking-newsताज्या घडामोडीपुणे

११२ घरफोड्या करणारा दरोडेखोर रोहित लंके अखेर गजाआड

पुणे – वय वर्ष फक्त २१, नाव रोहित नानाभाऊ लंके, घरफोड्या ११२, हे आहे पुण्यातील एका तरुणाचे गुन्हेगारीतील क्वालिफिकेशन. या तरुणाच्या घरफोडीतील प्रविण्यावरून पुणे पोलीस चक्रावून गेले आहेत. शिताफीने सापळा रचून भारती विद्यापीठ पोलिसांनी या नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या मात्र घरफोडीच्या क्षेत्रात कुलगुरू असलेल्या रोहित लंके याला अटक केली आहे. त्याच्याकडून सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

रोहित लंके हा सराईत घरफोड्या करणारा दरोडेखोर आहे. आतापर्यंत त्याच्या नावावर ११२ घरफोड्यांचे शतक झळकलेले आहे. त्याने केलेल्या तीन घरफोड्या आणि दोन जबरी चोरीच्या घटना पोलिसांनी उघडकीस आणल्या आहेत. काही दिवसांपूर्वी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक क्लिनिक फोडून रोहित लंके याने ७० हजारांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी तपास करत असताना भारती विद्यापीठ पोलिसांना एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये रोहित लंके आढळून आला. त्याच्याविषयी अधिक माहिती घेतली असता तो बिबवेवाडी येथील एका घरफोडीच्या गुन्ह्यात तुरुंगात असल्याचे समजले.

त्यानंतर तुरुंगात जाऊन रोहित लंके याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता त्याने आपल्या १००पेक्षा जास्त घरफोडींची पोलिसांकडे कबुलीही दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १०० ग्रॅम सोने आणि रोख रक्कम असा सव्वा सहा लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button