breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पालिकेच्या 13 प्राथमिक शाळा स्मार्ट सिटीअंतर्गत होणार विकसित, शिक्षण समितीची मंजुरी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 13 प्राथमिक शाळा स्मार्ट सिटी अंतर्गत अद्यावत करण्यात येणार आहेत. त्यासाठी या शाळांमध्ये डिजिटल क्लास रुम तयार केल्या आहेत. त्याद्वारे विद्यार्थ्यांना अद्यावत शिक्षण दिले जाणार आहे. याबाबतचा ठराव शिक्षण समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शहरात 108 प्राथमिक शाळा आहेत. यातील केवळ 13 च शाळा स्मार्ट सिटी अंतर्गत अद्यावत करण्यात येत आहेत. अत्याधुनिक साहित्य, संगणक कक्ष, डिजिटल क्लास रूम वगैरे बनविण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होणार असल्याचा कयास सदस्य पारित ठरावामध्ये बांधण्यात आला आहे. याबाबतच्या ठरावाला शिक्षण समितीच्या सभेत सभापती मनिषा पवार यांनी मंजुरी दिली आहे.

उर्वरीत शाळा देखील स्मार्ट सिटीद्वारे अद्यावत झाल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी निर्माण होईल. शाळेची पटसंख्या वाडेल, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढेल, अशी कल्पना सदस्यांनी मांडली आहे. या कामावर पालिकेचे लाखो रुपये खर्च होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button