breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लव्ह जिहादविरोधात कडक कायदा! योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा

लखनौ – लव्ह जिहादसंदर्भात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठी घोषणा केली आहे. केवळ लग्नासाठी धर्म बदलता येणार नाही, या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देऊन त्यांनी लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करणार असल्याची घोषणा केली. जे लोक आपली ओळख दडवून मुलींच्या सन्मानाला ठेच पोहोचवतात, त्यांचा ‘राम नाम सत्य होगा’ असा इशारा त्यांनी दिला.

राज्यातील महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी आम्ही ऑपरेशन शक्ती तयार केले आहे. त्यातून राज्यातील सर्व महिला व मुलींना सुरक्षा दिली जाईल. न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान आणि महिलांचाही सन्मान यातून केला जाईल. अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ लग्नासाठी धर्मांतर करणे योग्य नाही, असा निर्णय दिला आहे. त्यामुळे लव्ह जिहादसारख्या घटना रोखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार लवकरच कडक कायदा करील, असे मुख्यमंत्री योगी यांनी जौनपूर येथील पोटनिवडणुकीच्या प्रचार सभेत सांगितले. लपून-छपून महिला आणि मुलींच्या इज्जतीशी जे खेळतात ते सुधारले नाहीत तर त्यांचे राम नाम सत्य होणार हे निश्चित, असा गर्भीत इशारा त्यांनी यावेळी दिला. राज्यातील प्रत्येक मुलगी आणि महिलेला सुरक्षेची हमी देण्यासाठी ऑपरेशन शक्ती ही मोहीम आम्ही आखली आहे, असे त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button