TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

नवीन 01 रूग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

पिंपरी चिंचवड | मावळ तालुक्यात सोमवारी (दि.20) 01 रुग्णाचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 01जणाला डिस्चार्ज देण्यात आला. आज एकही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही,आतापर्यंत 524 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 33 आहे.शहरी भागात 01 रूग्ण तर ग्रामीण भागात एकही रूग्ण आज सापडला नाही.आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत एकही रूग्ण सापडला नाही.तर लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 01रूग्ण आज सापडला आणि वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत एकही रूग्ण आज सापडला नाही.

तालुक्यातील कोरोना बाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 27,797 झाली आहे. तर दिवसभरात 01 रुग्ण बरा झाल्याने घरी सोडण्यात आला.

सोमवारी कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात एकही रूग्ण आज सापडला नाही.27,240 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.आतापर्यंत 524 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,894, लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,551 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1,384 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 14,829 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,968रुग्ण आढळून आले आहेत.

एकही रुग्णाची परिस्थिती गंभीर नाही.कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 98.00 टक्के आहे तर मृत्यू दर 1.89 टक्के आहे.सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 15, लोणावळा नगरपरिषदमध्ये 05, वडगाव नगरपंचायतमध्ये 01 व ग्रामीण भागात 12 असे एकूण 33 रुग्ण आहेत.अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button