breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अतिक्रमणमध्ये घरे पाडलेल्या नागरिकांना लढ्याद्वारे न्याय देऊ – देवेंद्र तायडे

– वडमुखवाडी येथील घरे पाडलेल्या नागरिकांची वंचित बहुजन आघाडीतील पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहरातील वडमुखवाडी येथील वस्ती रेडझोनचे कारण देत पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने गोरगरीब, कष्टकऱ्यांची घरे अतिक्रमणाच्या नावाखाली पाडली आहेत. नागरिकांना विस्थापित करण्याचे काम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांनी केले आहे. येणाऱ्या काळामध्ये हा लढा मोठा करून येथील विस्थापितांना न्याय देण्यात येईल असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे यांनी दिले.

विस्थापितांना न्याय देण्यासाठी त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने वडमुखवाडी येथील नागरिकांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष इंजि.देवेंद्र तायडे, सर्वजीत बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील आंदोलनात्मक ध्येय धोरण ठरवण्यात आले.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव राजन नायर, युवा आघाडीचे माजी अध्यक्ष गुलाब पानपाटील, महिला आघाडी महासचिव गौरी शेलार, शहर कार्यकारणी सदस्य राजेंद्र साळवे, राहुल बनसोडे, आकाश डोंगरे, आदींसह महिला आघाडी पदाधिकारी, कार्यकर्ते व वडमुखवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button