breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार महेश लांडगेंनी नव्या वर्षाची सुरुवात केली श्री क्षेत्र भीमाशंकराच्या दर्शनाने

पिंपरी चिंचवड – नववर्षाला सुरुवात झाल्यामुळे आज देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. गेले वर्ष हे कोरोनाने ग्रासले होते. त्यामुळे लोकांनी या नव्या वर्षाचे स्वागत एक नवी उमेद मानत ठेऊन केले आहे. या कोरोना महामारीने आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जाऊन जगायचे कसे हे शिकवले. दरम्यान या नवीन वर्षाचे स्वागत करून अनेक राजकीय नेत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

वाचा :-‘प्राईड ऑफ पिंपरी-चिंचवड’; प्रातिनिधिक २५ कोरोना योद्धांचा होणार सन्मान

परंतु भोसरी विधानसभा मतदार संघाचे आमदार महेश लांडगे यांनी या नवीन वर्षाची सुरुवात मंगलमय केली आहे. आमदार महेश लांडगे यांनी नवीन वर्षाची सुरुवात बारा ज्योतिर्लिंग पैकी एक श्री क्षेत्र भीमाशंकराच्या दर्शनाने केली. त्यांनी भीमाशंकर या मंदिराकडे केलेला प्रवासचा व्हिडिओ आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केला आहे. याद्वारे त्यांच्यासोबत आपणही श्री क्षेत्र भीमाशंकर यांचे दर्शन घेऊन शकतो.

वाचा :-पिंपरी-चिंचवडमधील राष्ट्रवादीच्या नगरसेवकाची ‘I Love Ravet’फ्लेक्सबाजी

कोरोना संसर्गामुळे २०२० हे संपूर्ण वर्ष जगाकरिता अत्यंत आव्हानात्मक होते. परंतु सर्वांनी कोरोनाच्या आव्हानाला धैर्याने तोंड दिले. खुद्द महेशदादा लांडगे आणि त्यांच्या कुटुंबाला देखील कोरोनाने घेरले होते. परंतु या कोरोनाला धैर्याने तोंड देत महेशदादांनी या कोरोनावर मात केली. तसेच त्यांनंतर त्यांनी नागरिकांना आवाहन करत या कोरोनाशी कसे लढायचे याबाबदल मार्गदर्शन केले. दरम्यान आज त्यांनी येणारे संपूर्ण वर्ष सुख समृद्धी तसेच आरोग्यदायी जावो हीच प्रभू शंकराचरणी मनापासून प्रार्थना केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button