breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मनसेने पूर्वाश्रमीचे ऋण फेडले; सचिन चिखले यांचा खुलासा

महापौर पदाचे उमेदवार राहूल जाधव यांना मतदान

पिंपरी – महापौर, उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीत मनसे नगरसेवक सचिन चिखले यांनी चक्क महापौर पदाचे भाजपचे उमेदवार राहूल जाधव यांना मतदान केल्याने महापालिकेत उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. त्यावर गतकाळात भाजपचे तीन आणि मनसेचे चार नगरसेवकांचे संख्याबळ असताना त्यांचा एकत्र गट तयार होऊ न शकल्यामुळे राहूल जाधव यांची स्थायी समितीचे सदस्य होण्याची अपेक्षा भंगली होती. त्याचे ऋण आज जाधव यांना मतदान करून फेडले असल्याचा खुलासा सचिन चिखले यांनी दिला आहे.

 

सचिन चिखले यांनी यासंदर्भात लेखी खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, 2012-2017 मध्ये राहूल जाधव हे मनसेचे नगरसेवक होते. त्यावेळी पालिकेत मनसेचे एकूण संख्याबळ चार होते. आणि भाजपचे तीन असे होते. दोन्ही पक्षाचा एक गट झाला असता तर तत्कालीन स्थायी समितीवर सदस्य होण्याची राहूल जाधव यांची अपेक्षा पूर्ण झाली असती. परंतु, पक्षाच्या ध्येयधोरणांसाठी चिखले यांच्या सूचनेचा मान राखून जाधव यांनी माघार घेतली होती. त्यातच आज राहूल जाधव हे भाजपचे नगरसेवक आहेत. त्यांनी महापौर पदासाठी अर्ज केला होता. आज मतदान घेत असताना चिखले यांनी पूर्वाश्रमीचे ऋण चुकते करण्यासाठी जाधव यांना मतदान केले, असा खुलासा चिखले यांनी केला आहे.

 

तसेच, जाधव यांनी सुध्दा मनसेवर आजही प्रेम असल्याचे मान्य केले. ज्यावेळी राष्ट्रवादीचे शहरात वातावरण असताना मनसेच्या तिकीटावर उभा राहिलो असता जाधववाडी भागातील नागरिकांनी मला काम करण्यासाठी निवडून दिले. मनसेमुळे मला नागरिकांच्या अडीअडचणी सोडविता आल्या, अशी भावना त्यांनी दोन दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. त्यानुसार जाधव यांनी आजही राज ठाकरे यांचे नाव घेऊन मनसेचे आभार मानल्याने चिखले यांनी जाधव यांचे कौतुक केले. तर, उपमहापौर पदासाठी मनसेने तटस्थ भूमिका घेतली होती.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button