breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एसीबीकडून चौकशी करा

पुणे |महाईन्यूज|

भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एसीबीनं चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी तक्रारदार असलेल्या अंजली दमानिया यांचे वकिल असीम सरोदेंनी तशी लेखी मागणी न्यायालयात केली आहे. त्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही या प्रकरणात चौकशी होणार का असा सवाल उपस्थित होत आहे.

तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या बैठकीतील सगळे पुरावे मिनीट्स ऑफ मिटिंग रद्द करण्याचे फडणवीसांनी आदेश दिले होते, असा गभीर आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. याबाबत 23 फेब्रुवारीला न्यायालय निकाल देणार आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत वाढ होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

एकनाथ खडसे यांच्या भूखंड घोटाळा प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मदत केल्याचा संशय व्यक्त करत फडणवीस यांची देखील अँटी करप्शन ब्युरोने चौकशी करावी अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. शिवाय या भूखंड घोटाळा प्रकरणात तब्बल दहा तत्कालीन अधिकारी आणि मंत्र्यांची नावं दमानिया यांनी दिली असल्याचे कळत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button