breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारतात लस विक्री व वितरणाची परवानगी द्या, फायझरची DCGI कडे मागणी

नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून कोरोनाने जगभरात दहशत पसरवली आहे. मात्र, लसीबाबत सकारात्मक बातम्या समोर येत असल्याने आता कोरोनाची चिंता लवकरच मिटणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यातच, आता भारतातही लवकरच कोरोनावर प्रभावी ठरलेल्या लसीचे वितरण करण्याची परवानगी देण्यात येणार असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली होती. त्यानुसार, कोरोनावर लस बनवणाऱ्या फायझर कंपनीने भारतात लस विक्री व वितरणाची परवानगी मागितली आहे.

फायझरची लस ९५ टक्के प्रभावी असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली होती. तसेच, या लसीच्या ट्रायलचे तिन्ही टप्पे पूर्ण झाल्याने फायझर इंडियाने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे (DCGI) लसीच्या वापराबाबत परवानगी मागितली आहे. असा अर्ज करणारी फायझर इंडिया पहिली औषधनिर्माण कंपनी ठरली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनन सरकारनं फायझर व बायोएनटेकने विकसित केलेल्या लसीच्या वापराला परवानगी दिली होती. त्याचबरोबर बहारिनमध्येही लस वापरण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानंतर फायझरने भारत सरकारकडे परवानगी मागितली आहे.

आवश्य वाचा:-भारतातील कोरोनाबाधितांची संख्या 96,44,222 वर

लसीची आयात करण्याची, त्याचबरोबर देशभरात लसीची विक्री आणि वितरण करण्याची परवानगी फायझरने केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे केलेल्या अर्जात मागितली आहे. नवीन औषधी व क्लिनिकल चाचणी नियम २०१९ नियमांतंर्गत सध्या सुरू असलेल्या चाचण्यामधून सूट देऊन अशा प्रकारची परवानगी देण्याची विशेष तरतूद असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

फायझर इंडियाने ४ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला आहे. या लसीचा भारतात आपातकालीन स्थितीत वापर करण्याची परवानगी देण्याची मागणी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेकडे फायझरने केल्याचे सूत्रांनी सांगितले.

जगात फायझरच्या लशीचे २०२० मध्ये ५ कोटी डोस तयार केले जाणार आहेत. २०२१ अखेर १.३ अब्ज डोस उपलब्ध केले जातील. एकूण १७० स्वयंसेवकांवर लशीचे प्रयोग करण्यात आले असून वय, वंश, लिंग या सर्व पातळ्यांवर फायझरची लस प्रभावी ठरली आहे. ही लस वयस्कर व्यक्तींसह सर्वामध्ये ९५ टक्के प्रभावी ठरल्याचे सांगण्यात आलं होतं. ६५ वर्षांवरील व्यक्तीतही ही लस प्रभावी ठरली आहे. दरम्यान, फायझरची लस साठवण्यात काही अडचणी आहेत. त्यासाठी खूप कमी तापमान लागते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button