breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

अडचणीत सापडलेल्या एक्सिस बँकेला अजून एक मोठा फटका…BMC कर्मचाऱ्यांची खातीही एक्सिसमधून वर्ग होणार…

मुंबई |महाईन्यूज |

मिसेस फडणवीस आणि शिवसेनेमधल्या राजकीय गोंधळामुळे अडचणीत आलेल्या एक्सिस बँकेला अजून एक मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ठाण्यापाठोपाठ आता मुंबई महापालिकेचाही कर्मचाऱ्यांची एक्सिस बँकेतील खाती सरकारी बँकेत वळवण्याचा विचार सुरु आहे, तशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ठाणे महानगरपालिकेच्या निर्णयाबद्दल वाचलं. महापालिकेत असा निर्णय करायचा असेल तर आमचे गटनेते आणि सर्व नेत्यांची चर्चा करावी लागेल. त्याचबरोबर आमचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून याबाबत निर्णय घेऊ, असंही त्या म्हणाल्या. आमच्या अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना एक्सिस बँक 40 लाखांचा विमा देते. त्यामुळे प्रथमता याची खात्री केली जाईल की इतर कोणती बँक 40 लाखांचं सुरक्षा कवच देते का?, यानंतर त्यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असही पेडणेकर म्हणाल्या. या विषयासंदर्भात मी सोमवारी पालिकेतील इतर नेत्यांसोबत पेडणेकर बैठक घेऊऩ चर्चा करणार आहे. तसेच आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा करणार आहे. याबाबत त्यांना देखील विचारात घेतलं जाईल. शेवटी यावर सगळ्यांचं एकमत होणं गरजेचं आहे. तरच निर्णय घेऊ, असेही त्या म्हणाल्या.

पेडणेकर म्हणाल्या की, आज पंजाब नॅशनल बँकेसारखी बँक बुडीत निघाली. प्रत्येकाला आपल्या पैशांची काळजी असते की आपल्या मेहनतीचा पैसे असा बुडू नये. आम्हीही याची काळजी घेऊ की मुंबईकरांचा आणि करदात्यांचा पैसा असा कुठल्याही बँकेत जाऊ नये, ज्या बुडीत जाऊ शकतात. त्यापेक्षा दोन टक्क्यांनी कमी जरी पैसे मिळाले तरी चालेल, तरी ते पैसे राष्ट्रीयीकृत बँकेत असतील. त्यामुळे ते पैसे सुरक्षित राहतील, या दृष्टीने आम्ही विचार करू, असे त्या म्हणाल्या. मात्र यासाठी आम्हाला आधी सर्वांशी चर्चा करावी लागेल. त्यांच्याबरोबर चर्चा केल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. अग्निशामक दलाचे पगार अॅक्सिस बँकेत जातात. त्या कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांशी चर्चा करावी लागेल. त्यांचा होकार येणे महत्वाचे आहे. यासाठी सर्वांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, असे देखील पेडणेकर यांनी सांगितलं.

एक्सिस बँकेतील सर्व खाती सरकारी बँकेत वळवण्याचा मोठा निर्णय़ ठाणे महापालिकेचा घेतला.दरम्यान मुंबई आणि महाराष्ट्र पोलिस खात्यातील 2 लाख कर्मचाऱ्यांची सॅलरी अकाऊंट एक्सिस बँकेत आहेत. पोलिसांच्या खात्यातून एक्सिस बँकेत वर्षाला 11 हजार कोटींची उलाढाल होते. या निर्णयामुळे मात्र हे पोलीस खातेदार एक्सिस बँकेला गमवावे लागू शकतात.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button