breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

खासदार उन्मेश पाटलांचा ठाकरे गटात प्रवेश, भाजपावर गंभीर आरोप; म्हणाले..

मुंबई | जळगावचे भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. उन्मेश पाटलांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाची मशाल हाती घेतली आहे. पक्षप्रवेशावेळी खासदार उन्मेश पाटील यांनी भाजपवर गंभीर आरोप केला आहे.

खासदार उन्मेश पाटील म्हणाले की, महाराष्ट्राचा स्वाभिमान जागृत ठेवत, भारताला मराठी बाणा दाखवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आज मी प्रवेश करत आहे. मी भाजपा सोडून ठाकरे गटात प्रवेश करत असल्याने मला अनेकजण विचारत आहेत की, उमेदवारी मिळाली नाही म्हणून तुम्ही नाराज आहात का? मी या सर्वांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, राजकारण करताना आमदार, खासदार होणं हे एवढंच माझं ध्येय नव्हतं. मी खूप चांगल्या हेतूने काम करत होतो. परंतु, राजकारणात काम करताना, आमदार असताना आज आपण जी शासकीय योजनांची जत्रा पाहतोय, त्याचा पॅटर्न आम्ही चाळीसगावात राबवला होता. दुर्दैवाने त्याला किंमत मिळाली नाही. मी मागणी न करता मला मागील वेळेस लोकसभा उमेदवारी मिळाली. परंतु, यावेळी मला एका भावाने दगा दिला तरी दुसरा भाऊ म्हणजे शिवसेना माझ्याबरोबर आहे आणि याचा मला आनंद आहे.

हेही वाचा    –      Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर दोन दिवस ब्लॉक 

आम्हाला बदल्याचं नव्हे तर बदलाचं राजकारण हवं आहे. पद महत्वाचं नाही. परंतु, आमची अवहेलना करण्यात आली, मला मानसन्मान नको, कार्यकर्त्याची अवहेलना होते तेव्हा तो घुसमटतो. राज्यात विकासाऐवजी विनाशाची, बदलाऐवजी बदल्याची भावना रुजवली जात आहे. परंतु, मला त्या पापातला वाटेकरी व्हायचं नाही. आमचा स्वाभिमान जपला जात नसेल, बैठकीला बोलावलं जात नसेल, तर स्वाभिमान गहाण ठेवण्याऐवजी मी या लढाईत सहभागी व्हायचं ठरवलं आहे. क्रांतीची मशाल पेटवायचं ठरवलं आहे. मी शब्द देतो की, मी पदासाठी किंवा खासदार होण्यासाठी इथे (ठाकरे गट) आलो नाही. उद्धव ठाकरे यांनी मला सांगितलं आहे की, जळगावात शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे. माझ्यासह सर्व सहकारी जळगावात मशाल पेटवू. मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना शिवसेनेनं सामावून घेतलं आहे. त्याबद्दल मी उद्धव ठाकरेंचे आभार मानतो, असंही उन्मेश पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button