breaking-newsराष्ट्रिय

पुन्हा चांद्रमोहीम कशासाठी?

साधारण दहा वर्षांनी पुन्हा एकदा भारताने चांद्रमोहीम हाती घेतली, यात अवकाशाचा अधिक सखोल वेध, सुधारित तंत्रज्ञानाचा वापर, संशोधनातील जागतिक आघाडय़ा अशी अनेक वैशिष्टय़े आहेत. चांद्रयान-१ मोहिमेत इस्रोच्या यानाला पाण्याचे अस्तित्व सापडले होते, त्याचा आणखी पाठपुरावा यात केला जाणार आहे. आतापर्यंत अमेरिकेच्या अपोलो मोहिमातून १२ जण चंद्रावर जाऊन आले आहेत. त्यानंतर अनेक अवकाश यानांनी त्याचा वेध घेण्याचा प्रयत्न केला. एकतर चंद्र हा पृथ्वीला जवळ असलेला वैश्विक घटक आहे. दूरच्या अवकाश मोहिमांसाठीच्या तंत्रज्ञानाची चाचणी या चांद्रमोहिमांत आपोआपच होत असते. त्यामुळे त्याचे वेगळे महत्त्व आहे, शिवाय तेथे पाण्याचे अस्तित्व असण्याची शक्यताही वर्तवली जाते.

चंद्रावरील पाण्याच्या शक्यतेत गांभीर्य कि

पृथ्वी व तिचा नैसर्गिक उपग्रह असलेला चंद्र यांच्यात सामायिक असे बरेच काही आहे. त्यांच्यातील खनिज रचनाही साधम्र्य सांगणारी आहे. चंद्र व पृथ्वी यांचे नाते पाण्यामुळेच आहे असे मानले जाते. चांद्रयान १ मोहिमेत पाण्याचे थेंब सापडले होते त्याचा पाठपुरावा करणे गरजेचे आहे, असे भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या वैज्ञानिकांना वाटते. चंद्राच्या पृष्ठभूमीवर दहा मीटरच्या खाली पाणी आहे असा अंदाज आहे.

संपूर्ण चंद्रावर पाणी आहे का?

सगळ्या चंद्रावर पाणी नाही. सध्यातरी तेथे पाण्याचा काही प्रमाणात अंश आहे. चंद्राच्या ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच नेहमी अंधारात राहिलेला चंद्राचा दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुवापेक्षा महत्त्वाचा आहे. सतत अंधारात असलेल्या भागातच म्हणजे दक्षिण ध्रुवावर पाणी असण्याची शक्यता आहे. चांद्रयान २ हे अवकाशयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे जिथे अजून कुठल्याही देशाचे यान उतरलेले नाही. दक्षिण ध्रुवावर जी विवरे आहेत त्यातील खोल भागात थंड पट्टे आहेत तेथे आधीच्या सौरमालेचे अवशेष जीवाश्माच्या रूपात असू शकतात. दक्षिण ध्रुवावर सूर्यप्रकाश नसल्याने तेथे बर्फाच्या रूपात पाणी आहे. चांद्रयान २ वर अतिशय संवेदनशील उपकरणे असून त्यातून पाण्याचा शोध  घेतला जाईल.

यापुढे काय?

चंद्रावरील पाणी आणून ते भारतातील दुष्काळग्रस्त शहरांना पुरवण्याचे स्वप्न तूर्त तरी अशक्य आहे, पण अवकाश संशोधनात या मोहिमेमुळे  मोठी प्रगती साधली जाईल. चंद्रावरील पाण्याचा उगम नेमका काय आहे व सौरमालेतील पाण्याचे गूढही यातून उलगडणार आहे. मंगळसारख्या दूरच्या अवकाश मोहिमांसाठी एक मुक्कामाचे केंद्र म्हणून चंद्राचा थांबा म्हणून उपयोग होणार आहे.

हेलियम- ३ चा साठा महत्त्वाचा

चांद्रयान २ मोहिमेला एक महिना विलंब झालेला असून ही इस्रोची दुसरी चांद्रमोहीम आहे त्यासाठी १००० कोटी रुपये खर्च आला आहे. हेलियम ३ चा चंद्रावर शोध घेण्याचा प्रयत्न करणे हा त्यातील सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे. हेलियम ३ चा साठा चंद्रावर असण्याची शक्यता आहे.  हे समस्थानिक चंद्रावर भरपूर असून ते कचरामुक्त अणुऊर्जेसाठी उपयोगी असते. हेलियम ३ या समस्थानिकाची किंमत एक टनाला पाच अब्ज डॉलर्स असते. चंद्रावर किमान १ दशलक्ष मेट्रिक टन हेलियम साठा आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यातील केवळ एकचतुर्थाश हेलियम ३ पृथ्वीवर आणता येऊ  शकते.

चांद्रयान- २ खर्च

९६०

कोटी रुपये, चांद्रयान २

३८०कोटी रुपये

चांद्रयान-२ मोहिमेतील भाग

भूस्थिर उपग्रह प्रक्षेपक : चांद्रयान २ मोहिमेत जीएसएलव्ही एमके ३ हा प्रक्षेपक वापरण्यात आला. तो बाहुबली म्हणून ओळखला जातो. त्यात एस २०० सॉलिड रॉकेट  बूस्टर्स, एल ११० स्टेज, सी २५ अप्पर स्टेज हे भाग आहेत.

ऑर्बिटर : उड्डाणाच्या वेळी चांद्रयानने २ ऑर्बिटर  हे सतत इस्रोच्या ब्यालूलू येथील डीप स्पेस नेटवर्कला संदेश पाठवत राहील. शिवाय विक्रम लँडरशीही त्याचा संपर्क आहे. ऑर्बिटर एक वर्ष चंद्राच्या कक्षेत फिरत राहील. त्याची कक्षा १०० बाय १०० कि.मी. चांद्र ध्रुवीय कक्षा आहे.

* वजन-२३७९ किलो,  ’वीज निर्मितीची क्षमता-१००० वॉट

लँडर- विक्रम  : चांद्रयान २ च्या लँडरचे नाव विक्रम असे ठेवण्यात आले असून भारतीय अवकाश कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव त्याला देण्यात आले आहे. एका चांद्र दिवसात काम करण्यानुरूप त्याची रचना केली आहे. एक चांद्र दिवस हा पृथ्वीवरील चौदा दिवसांच्या बरोबरीचा असतो. विक्रमच्या मदतीने बंगळुरू येथील आयडीएसएन केंद्राशी संपर्क साधला जाईल. तसे ऑर्बिटर व रोव्हर यांच्याशीही त्याचा संपर्क राहील. लँडरच्या मदतीने अलगद अवतरण केले जाईल.

* वजन- १४७१ किलो ’वीज क्षमता- ६५० वॉट

रोव्हर-प्रग्यान : चांद्रयान २ वर सहा चाकांची ही बग्गीसारखी गाडी आहे. तिचे नाव प्रग्यान असे ठेवण्यातआले आहे. त्याचा संस्कृतमधील अर्थ प्रज्ञा असा आहे. ही गाडी ५०० मीटर प्रवास करू शकते व सौर ऊर्जेवर चालू शकते. त्याचा संपर्क केवळ लँडरशी असेल.

* वजन- २७ किलो विद्युत निर्मिती ’क्षमता ५० वॉट

 

* चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगद अवतरण करणारी पहिली अवकाश मोहीम.

* स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून चंद्रावर अवतरण. चंद्रावर अलगद अवतरण करणारा भारत चौथा देश ठरणार.

* चांद्रयान २ मोहिमेतील पेलोड (वैज्ञानिक उपकरणे)

* लार्ज एरिया सॉफ्ट एक्सरे स्पेक्ट्रोमीटर- चंद्राच्या मूलभूत रचनेची माहिती गोळा करणे.

* इमेजिंग आयआर स्पेक्ट्रोमीटर- खनिजशास्त्रीय नकाशे व बर्फ व पाण्याची निश्चिती करणे.

* सिंथेटिक अपरचर रडार एलअँड एस बँड- ध्रुवीय भागाचे नकाशे व आतल्या भागातील बर्फाची निश्चिती करणे.

* ऑर्बिटर बाय रेझोल्यूशन कॅमेरा- उच्च विवर्तन स्थानशास्त्रीय नकाशे.

* चंद्रा सरफेस थर्मो फिजिकल एक्सपिरिमेंट- औष्णिक वहन व तापमान यांचे नकाशे.

* अल्फा पाट्रिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर अँड लेसर इनडय़ूसड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोस्कोप- चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मूलद्रव्यांचा अभ्यास करणे.

ओडिशातील संस्थेत रोव्हरच्या भागांची निर्मिती

चांद्रयान २ मोहिमेत देशाच्या अनेक  भागातील किमान ६०० संस्थांनी काम केले आहे. या मोहिमेतील रोव्हरचे सुटे भाग भुवनेश्वरमध्ये दी सेंट्रल टूल रूम अँड ट्रेनिंग सेंटर येथे तयार झाले आहेत. यात इंधन टाक्यांचे २२ प्रकारचे व्हॉल्व्ह  तयार करण्यात आले असून क्रायोजेनिक इंजिनाचे महत्त्वाचे भाग तयार करण्यात आले होते. जीएसएलव्ही मार्क ३ हा बाहुबली प्रक्षेपक तयार करण्यात या संस्थेचा मोठा वाटा आहे. हा उपग्रह प्रक्षेपक चार टन वजनाचे उपग्रह वाहून नेऊ शकतो. चंद्रावर जी रोव्हर गाडी धावणार आहे तिचे भागही येथेच तयार झाले आहेत. भुवनेश्वर येथील सीटीटीसी संस्थेने या मोहिमेचे काम करण्यासाठी इस्रोशी २०१६ मध्ये करार केला होता. चांद्रयान १ मोहिमेतही महत्त्वाचे भाग याच संस्थेने पुरवले होते, असे व्यवस्थापकीय संचालक सिबाशीश मैती यांनी सांगितले. या वेळी जे भाग संस्थेने तयार केले त्यात, सोलर अ‍ॅरे ड्राइव्ह असेंब्ली, मोमेंटम व्हील असेम्ब्ली, रिअ‍ॅक्सन व्हील असेम्ब्ली, डायनॅमिकली टयुनड गायरोस्कोप, इस्रो लेसर गायरोस्कोप, मिनी अ‍ॅडव्हान्सड इनर्शियल सिस्टीम, रेट गायरो इलेक्ट्रॉनिक पॅकेज डिव्हाइस यांचा समावेश आहे. प्रज्ञान गाडीचे अवयव, चाके येथेच तयार क रण्यात आली आहेत. सहा चाकांची ही गाडी आहे.  ती सौरशक्तीवर पाचशे मीटर चालेल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button