breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

मुरुमांच्या समस्येमुळे त्रस्त आहात? ‘हे’ घरगुती फेस पॅक आहेत बहुगुणी

मुरुमांच्या समस्येमुळे आपल्या त्वचेचं भरपूर नुकसान होतं. या समस्येसाठी घरगुती फेस पॅकचा योग्य पद्धतीने वापर केल्यास नक्कीच सकारात्मक बदल पाहायला मिळतील.तर या घरगुती उपचारांमध्ये मध, ग्रीन टी, हळद, मुलतानी माती इत्यादी नैसर्गिक सामग्रींमध्ये त्वचेस पोषक असणाऱ्या घटकांचा समावेश आहे. जाणून घेऊया या सामग्रींपासून फेस पॅक कसे तयार करायचे?

  • ​​हळदीचे फेस पॅक

हळदीमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी सेप्टिक गुणधर्म असतात. हे घटक आपल्या त्वचेवरील हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्याचे कार्य करतात.

सामग्री : एक मोठा चमचा मध, अर्धा चमचा हळद, एक चमचा दूध

फेस पॅक तयार करण्याची पद्धत : एका वाटीमध्ये मध आणि हळद एकत्र घ्या. मिश्रण तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर १५ मिनिटांसाठी लावा. डोळ्यांच्या आसपास फेस पॅक लावू नये. यानंतर कोमट पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्या. हळदीमुळे चेहरा पिवळा दिसत असल्यास कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर दूध लावा. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

  • अ‍ॅपल सायडर व्हिनेगर व मुलतानी माती फेस मास्क

त्वचेवरील रोमछिद्रांमध्ये जमा झालेल्या दुर्गंध, धूळ, माती स्वच्छ करण्यासाठी मुलतानी रामबाण उपाय आहे. फार पूर्वीपासून मुलतानी मातीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग केला जातोय. अ‍ॅपल सायडर व्हिनेगरमुळे मृत त्वचेची समस्या दूर होण्यास मदत मिळते

सामग्री : एक मोठा चमचा मुलतानी माती, एक प्रोबायोटिक कॅप्सूल, दोन चमचे अ‍ॅपल सायडर व्हिनेगर

विधि : पेस्ट तयार करण्यासाठी सर्व सामग्री एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा. १५ मिनिटांनंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. यानंतर मॉइश्चराइझर देखील लावावे. अ‍ॅपल सायडर व्हिनेगर थेट चेहऱ्यावर लावण्याची चूक करू नये.

  • ​डाळिंब आणि टी फेस पॅक

डाळिंबा आणि ग्रीन टीमध्ये अँटी- इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत. सोबत यामध्ये अँटी ऑक्सिडंटचाही साठा आहे. हे घटक चेहऱ्यावरील मुरुम, सूज, त्वचा लाल होणे, जळजळ होणे इत्यादी समस्या दूर करण्यास मदत करतात. यामध्ये पॉलीफेनोल्स देखील असतं, जे त्वचेसाठी पोषक आहे.

सामग्री : एक मोठा चमचा ग्रीन टी पावडर, एक मोठा चमचा डाळिंब पावडर, एक मोठा चमचा मध, एक मोठा चमचा दही

फेस पॅक तयार करण्याची पद्धत : सर्व सामग्री एकत्र घ्या आणि पेस्ट तयार करा. लेप सुकल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. आठवड्यातून दोनदा हा उपाय करू शकता.

  • ​डाळिंब खाण्याचे फायदे

याव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही आपल्या आहारामध्ये डाळिंबाचा समावेश देखील करू शकता. डाळिंबमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, फॉलिक अ‍ॅसिड आणि अन्य कित्येक अँटी ऑक्सिडंटचा समावेश आहे. डाळिंबातील पोषण तत्त्वांमुळे आपल्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत मिळते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button