breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

… अखेर पीएमपीचे 155 कर्मचारी महापालिकेत वर्ग ; पीएमपी प्रशासनाचा आदेश

विधी सभापती माधुरी कुलकर्णीं यांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी ( महा ई न्यूज ) – ‘पीएमपीएमएल’च्या 155 कर्मचा-यांना पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवर घेवून त्याचा पीएफसह अन्य सुविधा पालिकेने द्यावेत, असे सांगून हे कर्मचारी पालिकेकडे वर्ग करण्यास पीएमपी प्रशासनाकडून विलंब लावला जात होता. परंतू, पीएमपी व्यवस्थापक आणि नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत पहिल्यांदा 155 कर्मचा-यांना पालिकेत वर्ग करण्याची मागणी करुन पीएमपी प्रशासनाला तीन दिवसाची डेडलाईन देण्यात आली होती. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने नमते घेत पिंपरी-चिंचवडमधील 155 पीएमपी कर्मचा-यांना पुर्वीच्या अटी वगळून महापालिकेत वर्ग करण्याचा आदेश दिल्याची माहिती विधी सभापती माधुरी कुलकर्णी यांनी दिली. 

याबाबत सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही प्रयत्न केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेत पुणे महानगर पहिवहन महामंडळाचे सुमारे 235 कर्मचारी सन 2001 पासून कामकाज करीत होते. त्यातील 80 कर्मचारी सेवानिवृत्ती झाले असून, 155 कर्मचारी अद्यापही सेवेत कार्यरत आहेत.  त्या सर्व कर्मचाऱ्यांचा वेतन, भत्ते व अन्य सोयी सुविधा पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ते घेत होते. मात्र, ते महापालिकेचे कामकाज करीत होते. त्यांची हजेरीची प्रतिपूर्ती दरमहिन्याला महापालिका पीएमपीएमएलकडे पाठवून देत होती. याबाबत तत्कालीन आयुक्‍त श्रीकर परदेशी यांनी देखील आदेश काढून महापालिकेतील कर्मचारी पीएमपीएमएलकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते. परंतु कर्मचा-याचा दबावामुळे त्या आदेशास त्यांना स्थगिती द्यावी लागली होती.

ही बाब पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंडे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी महापालिका आयुक्‍त दिनेश वाघमारे यांना पत्र देऊन कर्मचारी कार्यमुक्‍त करण्याची विनंती केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने 178 चतुर्थ श्रेणीतील शिपाई, हेल्पर, क्‍लिनर, वाहन चालक, लेबर यांच्यासह अन्य पदनाम सर्व कर्मचाऱ्यांना महापालिका सेवेतून वर्ग करण्याचा आदेश काढला. त्यातील काहींनी राजीनामा दिला तर काही सेवानिवृत्त होवून सध्यस्थितीत 155 कर्मचारी काम करीत होते.

पीएमपीएमएलमध्ये रुजू झालेल्या या 155 कर्मचाऱ्यांनी मागील दीड वर्षापासून पिंपरी चिंचवडमधील लोकप्रतिनिधींच्या गाठीभेटी घेत, महापालिका प्रशासनात परतण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र, तुकाराम मुंडे यांची बदली होताच, त्या कर्मचाऱ्यांना पालिकेत रुजू करुन घेण्यास राजकीय हालचाली जोरदार वाढल्या. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्यात आला. मात्र, पीएमपीच्या अध्यक्षा व्यवस्थापक संचालिका नयना गुंडे यांनी त्या कर्मचा-यांना परत महापालिकेत वर्ग करण्यावर काही अटी घातल्या होत्या. त्यात त्यांनी त्या सर्व कर्मचा-यांना पालिकेच्या आस्थापनावर घ्यावे, त्याचे पीएफसह सर्व सुविधा पालिकेने द्यावे, अशी मेख मारल्याने त्या कर्मचा-यांना पालिकेत वर्ग करुन घेण्यास अनेक अडथळे येवू लागले. त्यामुळे पालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनीही ते कर्मचारी वर्ग करण्यास पालिका विभाग प्रमुखाचा अभिप्राय मागविला. त्यात देखील कर्मचा-यांना विरोध दर्शविल्याने  आयुक्तांनी त्या प्रस्तावावर सही करण्यास हात आखडता घेतला होता.

दरम्यान, त्या कर्मचाऱ्यांना पीएमपीएमएल सेवेतून पुन्हा पालिकेत वर्ग करण्यास नगरसेवकांचा दबाव वाढल्याने पीएमपीसह पालिका प्रशासनाला झुकावे लागले. त्यामुळे पीएमपीएमएलच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी 2017 मध्ये पुणे महानगर महामंडळाकडे वर्ग केलेले 155 कर्मचा-यांना पुन्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग करण्यात येत आहे. तथापि या सर्व कर्मचा-याच्या वेतनापोटी होणारी रक्कम दरमहा आगाऊ स्वरुपात महामंडळाकडे वर्ग करण्यात यावी, तसेच सदरील कर्मचा-यांचा कामकाजाचा अहवाल नियमित प्रतिमहा स्वरुपात महामंडळाकडे पाठविण्यात यावा, असा आदेश नुकताच दिला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button