breaking-newsमुंबई

#CoronaVirus:नवी मुंबईत 20 पोलिसांना कोरोनाची लागण

नवी मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी तैनात असलेल्या अनेक पोलिसांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (प्रशासन) सुरेश मेंगडे यांनी दिली आहे .

काही दिवसांपूर्वी एपीएमसी पोलीस ठाण्यातील 3 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर तुर्भे एमआयडीसी पोलीस ठाण्यात एका आरोपीमुळे 3 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. तसेच सर्वाधिक पोलिसांना बंदोबस्तामुळे कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. बंदोबस्तमध्ये असणारे पोलीस कर्मचारी लोकांच्या संपर्कात आल्याने आतापर्यंत 20 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

शहरातील कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान आतापर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील एकूण 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधित क्षेत्र, नाकाबंदी, विनाकारण रस्त्यावर नागरिक अशा सगळ्यांसाठी 12 मार्चपासून पोलीस रात्रीचा दिवस करत आहेत. नागरिकांनी बाहेर येऊ नये यासाठी कधी कठोर भूमिका घेत कारवाईच सत्र सुरु आहे. तर कित्येकदा नागरिकांना विनंतीही केली जात आहे.

नियोजन नसल्याने एपीएमसी मार्केट सुरू करण्यात येत आहे. एपीएमसी मार्केटमध्ये सर्वाधित पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. एपीएमसीच्या पाचही मार्केटमध्ये रुग्ण सापडले असून शंभर पेक्षा जास्त रुग्ण फळ, भाजीपला आणि दाना मार्केटमध्ये आहेत. एपीएमसीमुळे कालपर्यंत (21 मे) 548 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत कोरोनाबधितांची संख्या 1422 वर पोहोचली आहे. यातील 47 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 548 जणांनी कोरोनवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button