breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आगामी अर्थसंकल्पाच्या कामाला सुरुवात

पिंपरी | प्रतिनिधी 

  • दहा लाखांपर्यंत कामे सुचविण्याचे नागरिकांना आवाहन

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आगामी सन 2022-2023 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प तयार करण्याच्या कामाला पालिका प्रशासनाने सुरुवात केली आहे. या अर्थसंकल्पामध्ये नागरिकांचा देखील सहभाग घेतला जाणार आहे. पिंपरी-चिंचवडकरांना त्यांच्या भागातील दहा लाख रुपयांपर्यंतची कामे सुचविता येणार आहेत. योग्य कामांचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात येणार आहे.

आपल्या शहराच्या अर्थसंकल्पात आपले योगदान असावे असे अनेकांना वाटते. मात्र ते योगदान कसे द्यायचे, हा महत्वाचा प्रश्न असतो. परंतु नागरिकांना अर्थसंकल्पात त्यांचे योगदान देता येते. अर्थसंकल्पाचे काम सुरु झाल्यानंतर ठराविक वेळेत प्रशासनाकडे कामांबाबत सूचना, अर्ज केल्यास योग्य कामांचा समावेश अर्थसंकल्पात करण्यात येतो. आपल्या प्रभागात, परिसरात कोणत्या गोष्टी असायला हव्यात, याबाबत सूचना देखील नागरिकांना करता येतात.

त्याच अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी नागरिकांना दहा लाख रुपयांपर्यंतची कामे सुचविण्याचे आवाहन केले आहे. कामे सुचवताना नागरिकांनी कामाचे स्वरूप व स्थान अचूकपणे लिहिणे आवश्यक आहे. कामानुसार अर्जातील माहिती भरावी. अर्ज भरण्यापूर्वी क्षेत्रीय कार्यालय किंवा सारथी हेल्पलाईनवर (8888006666) संपर्क साधावा. नागरिकांच्या सूचना अर्ज 20 डिसेंबर सायंकाळी पाचपर्यंत संबंधित क्षेत्रीय कार्यालय किंवा ई-मेलवर स्वीकारण्यात येणार आहेत. संबंधित क्षेत्रीय अधिकारी व कार्यकारी अभियंता हे सुचविलेल्या कामांची शहानिशा करून विकासकामांचा समावेश अर्थसंकल्पात करतील, यांची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

ही कामे सुचविता येणार

बसस्थानक, माहितीफलक, नामफलक, पदपथ, सायकल मार्ग, रस्ता डांबरीकरण, रस्ता दुभाजक, दुरुस्ती, बैठक व्यवस्था, रस्त्यावरील दिवे,  वाहतूक दिवे, इमारत दुरुस्ती, सार्वजनिक वाचनालय, पाणीपुरवठा ड्रेनेज, स्मशानभूमी, विर्सजन घाट, आरोग्य निरीक्षक केबिन, शौचालय, मुतारी कचरा कुंड्या बसविणे अशी कामे नागरिकांनी सुचवता येतील.  पुल, उड्डाणपुल, नवे रस्ते, भवन, बांधकाम अशी मोठी कामे सुचविता येणार नाहीत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button