breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीने घेतली मंत्री आदित्य ठाकरेंची भेट

मुंबई – शिवडी, नायगाव, वरळी येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला आणखी गती मिळावी यासाठी काल अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीने सह्याद्री अतिथी गृह येथे मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी माजी महापौर श्रद्धा जाधव, अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे भाई कांबळे, सरचिटणीस किरण माने उपस्थित होते.
यावेळी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीच्या प्रतिनिधींनी सोडत काढून बीडीडी चाळींच्या मुळ घराचा कायदेशीर करार करण्यात यावा अशी मागणी केली. तसेच मुखमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे बीडीडी पुनर्विकास प्रकल्प सादरीकरणवेळी संघटनेच्या प्रतिनिधींना चर्चा करण्याची संधी मिळावी, भाडेकरूंना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करावे, समन्वय समितीचे गठण व्हावे, 28 जून 2017 ची पात्रता पुढे वाढविण्यात यावी आणि संक्रमण शिबिराचा कायदेशीर करार करण्यात यावा यावरही सविस्तर चर्चा झाल्याची माहिती अखिल बीडीडी चाळ भाडेकरू हक्क संरक्षण समितीचे सरचिटणीस किरण माने यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button