breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अकोल्याच्या कृषी बाजार समितीत सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी

अकोला- दिवाळीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने आज मंगळवारी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठी गर्दी केली होती. या बाजार समितीत सर्वत्र सोयाबीनचे ढीगच ढीग दिसत होते. सोयाबीनला योग्य भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणले होते. आज तब्बल सहा हजार 290 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार 175 रुपयांचा दर मिळत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनला प्रचंड फटका बसला आहे. त्यामुळे पिकात घट झाली आहे. सोयाबीनची आवक कमी असल्याने चांगला दर मिळत आहे. दिवाळी सण आणि रब्बी हंगामातील पेरणीला आता सुरुवात झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button