breaking-newsताज्या घडामोडीपाटी-पुस्तकमहाराष्ट्र

चाळीस मिनिटाचे चार तास शाळेत होणार : वर्षा गायकवाड

मुंबई – महाराष्ट्र राज्य भौगोलिक दृष्ट्या पुर्णपणे वेगळा आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव ही जिल्हा – जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणात आहे. अशा वेळी शिक्षण चालू करणे आव्हानात्मक असले तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शिक्षण याला विचारात घेऊनच शिक्षण विभागाने नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी दिली

23 नोव्हेंबर पासून शाळा सुरू करत असताना केंद्र व राज्य सरकारने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करूनच अध्ययन – अध्यापन प्रक्रिया सुरू होणार आहे . 40 मिनिटांचे चार तासच शाळा होणार आहे. ही शाळा भरवताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याची सुचनाही शिक्षण विभागाने या पुर्वीच जाहीर केल्या आहेत व या सूचनांचे पालन होते आहे की नाही याची तपासणी संबंधित अधिकारी करणार आहेत. शाळा सुरू करण्यापुर्वी जिल्हा प्रशासन व महापालिके द्वारा शिक्षकांची आरोग्य तपासणी होणार आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजने अंतर्गत आरोग्य चाचणी राज्यात होतच आहे. अशा वेळी शाळेतील वर्ग सुविधा असल्यास खुल्या मैदानावर, मोकळ्या जागेत तसेच खेळत्या हवेच्या वर्गात घेण्याचीही मुभा शाळा व्यवस्थापनास दिली आहे.

स्थानिक प्रशासन, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, व्यवस्थापक व सरकार यांच्या सामुदायिक जबाबदारीवर एक दिवस आड करून विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण देण्यात येणार आहे. असे करत असताना शिक्षकांनी शिकवताना व विद्यार्थ्यानी शिकताना मास्क घालने बंधनकारक आहे. आरोग्य विषयक सर्व नियमांचे पालन शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी वर्गाने केले पाहिजे. ऑनलाईन शिक्षण पध्दती हा एक पर्याय म्हणून स्वीकारला गेला आहे. युट्यूब, गुगल लिंक, झुम, वॉट्सअॅप या माध्यमातून शिक्षण विद्यार्थ्यांपर्यत पोहचवण्यासाठी चांगल्याप्रकारे प्रयत्न केला गेला, परंतु प्रत्यक्ष शिक्षकांद्वारे संवाद व सवंगड्यासोबत शिक्षण अनुभव व ज्ञानार्जन करण्यासाठी शाळा सुरू होत आहेत असे करताना विद्यार्थ्यांची काळजी घेणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कुटुंबातील सदस्य आजारी असलेल्या विद्यार्थ्यांनी व स्वतःचे स्वास्थ्य चांगले नसल्यास खबरदारीचा उपाय म्हणून अशा विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये अशा सूचना ही दिल्या आहेत.
ऑनलाईन शिक्षणात शिकवलेल्या अभ्यासक्रमाची उजळणी, शंका समाधान व नवा विषय प्रत्यक्ष वर्गात शिकवला जाईल. दहावी व बारावीच्या परीक्षा संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व शिक्षण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. सर्व साधारणपणे या वर्षी परीक्षा उशिरा घेण्यात येतील असा अंदाज आहे. विदर्भातील ऊन, कोकणातील पाऊस व इतर जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊनच मे महिन्याच्या सुरुवातीला परीक्षा होऊ शकतात कारण राज्यातील सर्व जिल्ह्यातील परीक्षा एकाच वेळी घेणे ही फारच महत्त्वाचे आहे. कोरोना मुळे शिक्षण थांबले नाही, तर या आजाराने नैतिक जबाबदारी, सामुहिक जबाबदारी, स्वच्छता, आरोग्य या गोष्टींची प्रकर्षांने ओळख समाजाला झाली अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button