breaking-newsमनोरंजनमुंबई

जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे सावत्र पुत्र होते- अभिनेत्री पायल रोहतगी

मुंबई| महाईन्यूज|

राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सध्या संतापाचं वातावरण आहे. मात्र आता अभिनेत्री पायल रोहतगीनेही जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवल्यामुळे चांगलीच अडचणीत सापडलीये.

हीला राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी अटक केली आहे . देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि त्यांचे पिता मोतीलाल नेहरु यांच्यावर वादग्रस्त व्हिडीओ बनवून यू ट्यूबवर अपलोड केल्याप्रकरणी पायल रोहतगीला राजस्थानच्या बुंदी पोलिसांनी अटक केली आहे. बुंदी पोलिसांनी पायल रोहतगीला अहमदाबादमधून ताब्यात घेतलं.

देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरु हे मोतीलाल नेहरु यांचे सावत्र पुत्र होते. तसंच पंडित नेहरु यांच्या खऱ्या वडिलांचं नाव मुबारक अली होतं, असा दावा पायल रोहतगीने या व्हिडीओमध्ये केला आहे. शिवाय मोतीलाल नेहरु यांनी पाच लग्न केली होती, असंही तिने म्हटलं आहे. सोबतच व्हिडीओमध्ये पायलने काँग्रेस, जवाहरलाल नेहरु आणि मोतीलाल नेहरु यांच्याबाबत अनेक खळबळजनक दावे केले आहेत.

पायल रोहतगी तिच्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी अहमदाबादला गेली होती. बुंदीमधील काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांच्या तक्रारीवरुन पोलिस अहमदाबाद जाऊन तिला ताब्यात घेतलं. त्यानंतर तिला बुंदीला घेऊन गेले.” पायलचे पती संग्राम सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.

“गुगलवर उपलब्ध असलेली माहितीच या वादग्रस्त व्हिडीओमध्ये आहे. पायलविरोधातील प्रकरण राजकीय हेतूने प्रेरित आहे,” असा दावाही संग्राम सिंहने केला आहे.

तर स्वत: पायल रोहतगीने अटकेबाबत ट्वीट केलं आहे. गुगलवरुन माहिती घेऊन मोतीलाल नेहरु यांच्यावर व्हिडीओ केल्याप्रकरणी राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. फ्रीडम ऑफ स्पीच हा ज्योक आहे. पायलच्या अटकेनंतर संग्राम सिंहने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणाची दखल घ्यावी अशी विनंती केली आहे. संग्राम सिंहने ट्विटरवर गृहमंत्रालय, पंतप्रधान कार्यालय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मेंशन करुन , काँग्रेसशासित या राज्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे का? सर कृपया याकडे लक्ष द्या. असं लिहिलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button