ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात शेवटच्या दिवशी विकासकामांचे भूमिपूजन, उदघाटनांचा सपाटा

पिंपरी चिंचवड | पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ आज (रविवारी, दि. 13 मार्च) पूर्ण होत आहे. सोमवार (दि. 14) पासून महापालिकेचा प्रशासक कारभार हाकणार आहेत. त्यामुळे महापालिकेतील लोकप्रतिनिधींच्या शेवटच्या दिवशी शहरातील विविध विकासकामांचे उदघाटन, भूमिपूजन आणि लोकार्पण कार्यक्रम घेण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी 13 मार्च रोजी संपत आहे. त्यामुळे शेवटच्या दिवशी विविध विकासकामांचे भूमिपूजन, उदघाटन आणि लोकार्पण समारंभाचे आयोजन करण्यात आले. रविवारी (दि. 6) माजी मुख्यमंत्री राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यात आले.

त्यानंतर शनिवारी (दि. 12) आणि रविवारी (दि. 13 मार्च) देखील अनेक कामांचे उदघाटन आणि लोकार्पण करण्यात आले. सांगवी येथील प्रभाग क्रमांक 32 मधील विरंगुळा केंद्राचे उदघाटन करण्यात आले. चिंचवड येथील प्रभाग क्रमांक 118 मधील आरक्षण क्रमांक 221 मधील क्रीडांगण व जिजाऊ उद्यान जॉगिंग ट्रॅकचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर मोरया हॉस्पिटल ते मदर तेरेसा पुलापर्यंतचा रस्ता विकसित करण्याच्या कामाचे लोकार्पण झाले.

कासारवाडी येथील प्रभाग क्रमांक 20 मधील मंत्री कॉम्प्लेक्स शेजारील मोकळ्या जागेत बहूद्देशील हॉल विकसित करण्याच्या कामाचे उदघाटन झाले. इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठ मधील विरंगुळा केंद्र बांधण्याच्या कामाचे उदघाटन झाले.

भोसरी विधानसभा मतदारसंघात भोसरी आणि मोशी मध्ये देखील काही उदघाटन सोहळे झाले. भोसरी येथील प्रभाग क्रमांक सात मधील पुणे-नाशिक महामार्गावरील लांडेवाडी येथील कमानीचे उदघाटन झाले. भोसरी येथील संत ज्ञानेश्वर भाजी मंडई व व्यापारी संकुलाचे उदघाटन झाले. भोसरी सहल केंद्रातील फिश ऍक्वेरियम कामाचे भूमिपूजन देखील रविवारी झाले.

मोशी येथे प्रभाग क्रमांक तीन मधील संत ज्ञानेश्वर महाराज जलतरण तलाव वडमुखवाडी, श्री वाघेश्वर महाराज उद्यान च-होली बुद्रुक, इंद्रायणीधाम स्मशानभूमी च-होली बुद्रुक, बुर्डे वसंत जलकुंभ 20 दशलक्ष लिटर पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन झाले. प्राईड सिटी जलकुंभाचे भूमिपूजन झाले, तर श्री वाघेश्वर महाराज क्रीडा संकुल च-होली बुद्रुक याचे उदघाटन रविवारी झाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button