breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अंकुश लांडगे यांच्या हत्येतील आरोपी जितू पुजारीचा उपचारादरम्यान मृत्यू

भोसरी -भाजपचे तत्कालीन शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांच्या हत्येतील आरोपी जितू पुजारी याच्यावर सोमवारी (दि. 2) अज्ञातांनी खुनीहल्ला केला होता. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू असताना आज (मंगळवारी) पहाटे त्याचा मृत्यू झाला.

जितेंद्र ऊर्फ जितू जितेंद्र रामचंद्र साळुंखे ऊर्फ जितू पुजारी (वय 32, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे. भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

अंकुश लांडगे यांच्या हत्येतील मुख्य आरोपी गोट्या धावडे याच्या बरोबर जितू याला देखील अटक करण्यात आली होती. जितू याच्यावर अंकुश लांडगे यांच्या हत्येव्यतिरिक्त बलात्काराचा गुन्हा देखील दाखल होता. यामध्ये त्याला पाच वर्षांची शिक्षा झाली होती. धावडे याची कालांतराने सुटका झाली. मात्र जितू बलात्काराच्या गुन्ह्यातील शिक्षा भोगत होता. गोट्या याच्या खुनानंतर काही महिन्यांनी जितू कारागृहातून बाहेर आला होता. त्याच्यावर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास धावडेवस्ती भोसरी येथे अज्ञातांनी धारदार हत्यारांनी हल्ला चढविला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button