breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अपु-या निधीमुळे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचा प्रवास अडखळत !

– अद्याप निविदा प्रक्रियेत अडकली स्मार्ट सिटी कंपनी
– सध्यस्थितीत दोनशे कोटींचा निधी अपेक्षित 
पिंपरी – केंद्रातील भाजप सरकारच्या महत्वकांक्षी असलेल्या स्मार्ट सिटी योजनेला नूकतेच तीन वर्षे पुर्ण झाली. तर पिंपरी चिंचवड महापालिकेचा तिस-या टप्प्यात समावेश झाल्याने 25 जून 2018 रोजी एक वर्षे पुर्णे झाले. महापालिकेला एका वर्षात दोनशे कोटीच्या निधी अपेक्षित असताना केंद्र व राज्याचा केवळ 27 कोटी निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे तुटपुज्या निधीमुळे पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी योजनेचा खेळखंडोबा झाला असून अद्याप एरिया बेस डेव्हलमेंट आणि पॅन सिटीच्या निविदा प्रक्रियेत स्मार्ट सिटीची कंपनी अडकली आहे. त्यामुळे वर्षेभरानंतर स्मार्ट सिटी योजनांच्या कामांना गती मिळाली नसल्याचे दिसून येत आहे.
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेला 29 जूनला तीन वर्ष पुर्ण झाली. त्यानिमित्याने पुणे महापालिकेने 29 जून 2018 रोजी  कोरेगाव पार्कमधील एका हॅाटेलमध्ये कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त व पदाधिकारी उपस्थित होते.  केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाच्या देश पातळीवरील तिसऱ्या फेरीत पिंपरी-चिंचवडची निवड करण्यात आली. नवी मुंबई महापालिकेने स्मार्ट सिटीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या जागी पिंपरी-चिंचवडचा स्मार्ट सिटीत समावेश करण्यात आला. या प्रकल्पांतर्गत केंद्र सरकारकडून महापालिकेला पाच वर्षांत 500 कोटी, राज्य सरकारकडून 250 कोटी, तर महापालिका स्वहिस्सा रक्कम 399 कोटी असा निधी मिळणार होता.
पिंपरी चिंचवड महापालिकेने मागील वर्षेभरात केवळ स्मार्ट सिटी कंपनी (एसव्हीपी) स्थापन करुन त्या कंपनीचे संचालक मंडळ, कंपनीचे सीईओ, अधिकारी वर्गाची नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच कंपनीने बनविलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पातील एरिया बेस डेव्हलमेंट आणि पॅन सिटी सोल्यूशन करिता 1149.2 कोटी इतक्या रक्कमेच्या प्रकल्पाचा समावेश करुन प्रकल्पास केपीएमजी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये एरिया बेस डेव्हलमेंटचा 593.67 कोटी तर पॅन सिटीचा 555.53 कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्पांचा समावेश करण्यात आला. या दोन्ही प्रकल्पांमधील विविध कामांच्या निविदा प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच स्मार्ट सिटीच्या 17 प्रकल्पांचे डीपीआर तयार करण्यात येत आहेत. यासह 707.67 कोटीच्या 14 डीपीआर प्रकल्पांना पीसीएससीएलच्या संचालक मंडळाने मान्यता दिलेली आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या कामकाजासाठी वर्षेभरात केंद्र व राज्य शासनाने केवळ 27 कोटीचा निधी दिला आहे. तर महापालिकेने स्वहिस्सा म्हणून 24.97 कोटी रुपये घातले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहराच्या स्मार्ट सिटी योजनेसाठी वर्षभरात दोनशे कोटी रुपयाच्या निधीची आवश्यकता आहे. परंतू, तुटपुंज्या निधीमुळे स्मार्ट सिटीचा प्रवास अडखळत सुरु आहे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निधी कधी मिळणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
 ‘स्मार्ट सिटी’तून काय होणार?
पिंपरी चिंचवड शहरात लोकसहभागातून ‘स्मार्ट सिटी’साठी प्रकल्प निवडण्यात आला आहे. त्यानुसार, ११४९ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. शहरातील पिंपळे गुरव व पिंपळे सौदागर हा परिसर ‘मॉडेल’ म्हणून निवडण्यात आला आहे. ‘स्मार्ट सिटी’साठी विशेष उद्देश वहन (स्पेशल पर्पज व्हेइकल – एसपीव्ही) कंपनीकडून माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील सुविधांचे सक्षमीकरण, पाणीपुरवठा वितरण व्यवस्था, पथदिवे, सिग्नल यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, पार्किंग आदी विविध पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीतून नागरिकांना चांगल्या क्षमतेने पायाभूत सुविधा लाभ मिळणार आहे. परंतू, अद्याप निधीमुळे निविदा प्रक्रियेत सर्व कामे अडगळीत पडलेले आहेत. 
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button