breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

Earthquake in Delhi: दिल्लीत पहाटे भूकंपाचे हादरे; नागरिकांमध्ये घबराट

नवी दिल्ली – आज दिल्लीकरांची पहाट भूकंपाच्या हादऱ्यांनी झाली. दिल्लीकर साखर झोपेत असताना नांगलोई येथे भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद 2.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाली नाही, मात्र नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आज पहाटे 5 वाजून 2 मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले.

पहाटेच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवल्याने अचानक जाग आलेल्या लोकांच्या मनात धस्स झालं. जमीन हालत असल्याचं पाहून स्थानिकांनी तात्काळ घराबाहेर पळ काढला. त्यानंतर कोणताही धोका नसल्याची जाणीव झाल्यानंतरच त्यांनी घरात प्रवेश केला.

दरम्यान, फिलिपाईन्सची राजधानी मनीला येथेही आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. मनाली येथील भूकंपाची तीव्रता 6.3 इतकी नोंदवण्यात आली आहे. मनालीत भूकंपाचे जोरदार धक्के जाणवल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेआहे. मात्र येथील जीवित वा वित्तहानीची अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button