मित्राकडूनच अंकिताचा किसिंग व्हिडिओ व्हायरल

टेलिव्हिजनची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अंकिता लोखंडे हे नाव सध्या चाहत्यांच्या चांगलंच चर्चिलं जातं आहे. अंकिता लवकरच विकी जैनसोबत लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा रंगत आहे. यामध्येच अभिनेता अर्जुन बिजलानीने सोशल मीडियावर अंकिता आणि विकीच्या किसिंगचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.
अर्जुनने त्याच्या इन्टाग्राम स्टोरीमध्ये अंकिता- विकीचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये विकी आणि अंकिता एका लग्नसोहळ्यांमध्ये किस करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे पाहून या दोघांनीही एकाअर्थी या नात्याची सर्वांसमक्ष ग्वाही दिली आहे, असं म्हणायला हरकत नाही.
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनय विश्वात पदार्पण करणारी अंकिता विकीच्या आधी सुशांत सिंह राजपूतला डेट करत होती. मात्र कालांतराने काही वारणास्तव या दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि ते विभक्त झाले. ब्रेकअपनंतर अंकिताने तिचा मोर्चा करिअरकडे वळविला. अभिनेत्री कंगना रानौत हिची महत्त्वाची भूमिका असणाऱ्या ‘मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झांशी ‘या चित्रपटातूनही अंकिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.