breaking-newsताज्या घडामोडीपुणे

परराज्यातील भक्षक; महाराष्ट्रात रक्षक!

  • शहरातील सुरक्षा रक्षक एजन्सीकडून परराज्यातील गुन्हेगारांची नेमणूक
    परराज्यातील भक्षक; महाराष्ट्रात रक्षक!
    परराज्यातील पोलीस व्हेरीफिकेशनही बंधनकारक करणार -पोलीस उपायुक्त डहाणे

पुणे – परराज्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडे, हाणामारी, लुटमार असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तींची शहरातील सुरक्षा एजन्सींकडून सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात येत आहे. ज्यांच्या खांद्यावर सराफी दुकाने, शैक्षणिक आस्थापना, कॉर्पोरेट कार्यालये, सोसायट्या यांची सुरक्षा सोपवली गेली आहे, ते सराईत गुन्हेगार असल्याचे वास्तव एका टोळीतील सदस्यांना जेरबंद केल्यावर उघडकीस आले आहे.

आता राष्ट्रीय पातळीवर एकच डेटा
शहरातील काही सुरक्षा एजन्सींकडून जुजबी पडताळणी करुन परराज्यातील व्यक्तींची सर्रास भरती केली जात आहे. सुरक्षा एजन्सींना कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. मात्र, पोलीस व्हेरिफिकेशन करताना त्यांच्यावर महाराष्ट्रात काही गुन्हे दाखल आहेत का? याची पाहणी केली जाते. परराज्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? हे पाहण्याची कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. यासंदर्भात एक राष्ट्रीय डेटा करण्याचे काम क्रेंदीय पातळीवर सध्या सुरू आहे. मात्र, त्याला आणखी एक वर्ष लागण्याची शक्‍यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून सुरक्षा एजन्सींना आता कर्मचारी मूळ ज्या राज्यातील रहिवाशी आहे. त्या राज्यातील पोलीस व्हेरिफिकेशनही बंधनकारक करण्यात येणार आहे.

काही सुरक्षा एजन्सी पोलीस अधिकाऱ्यांच्याच
शहरात सुरक्षा एजन्सीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. यामध्ये बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सुरक्षा एजन्सींची संख्या मोठी आहे. पोलीस दलात कार्यरत असतानाच मुलाच्या किंवा पत्नीच्या नावाने सुरक्षा एजन्सीचा परवाना काढला जातो. पोलीस दलात कार्यरत असल्याने सुरक्षा एजन्सीचा परवाना घेण्याचे सर्व नियम माहिती असतात. तसेच तो सहजासहजी मिळवताही येतो. प. सुरक्षा रक्षक पुरवताना संस्थयाकडून 12 ते 18 हजार रुपये घेतले जातात. मात्र प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकाला एजन्सी 8 ते 10 हजार रुपये देतात. परराज्यातील विशेषत: बिहार व उत्तरप्रदेशातील व्यक्ती अतिशय कमी वेतनावर कामाला तयार होतात. यामुळे तेथील व्यक्तींची सर्रास भरती करण्यास प्राधान्य दिले जाते. असे करताना सुरक्षेचे मात्र कोणतेही मापदंड पाळले जात नाहीत.

गुन्हे करुन महाराष्ट्रात आश्रय आणि रोजगारही
उत्तरप्रदेश, बिहार आदी राज्यांतून गुन्हे करुन गुन्हेगार महाराष्ट्रात आश्रयाला येण्याचे प्रमाण मोठे आहे. येथे बांधकाम साईटवर कामगार म्हणून किंवा सुरक्षा एजन्सीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून ते रुजू होतात. येथे काम करताना अनेकदा त्यांच्यातील मूळ गुन्हेगारी प्रवृत्ती उफाळून येते. यामुळे त्यांच्याकडून अनेक गुन्हे होतात. उत्तरप्रदेशातील आंतरराज्य गुन्हे करणाऱ्या टोळीतील दोन सदस्यांना गुन्हे शाखेने नुकतेच जेरबंद केले. हे दोन्ही सदस्य सुरक्षा रक्षक म्हणून बड्या आस्थापनांमध्ये काम करत होते. हे काम करत असतानाच ते सराफी दुकानांची रेकी करुन त्यांच्या उत्तर प्रदेशातील म्होरक्‍याला त्याची माहिती कळवत होते. या टोळीने 2014 मध्ये कोरेगाव पार्क येथे 1 कोटी 42 लाखांचा आणि हडपसर येथे सराफी पेढीवर चाळीस लाख रुपयांचा दरोडा टाकला होता.

  • आता राष्ट्रीय पातळीवर एकच डेटा
    शहरातील काही सुरक्षा एजन्सींकडून जुजबी पडताळणी करुन परराज्यातील व्यक्तींची सर्रास भरती केली जात आहे. सुरक्षा एजन्सींना कर्मचाऱ्यांचे पोलीस व्हेरिफिकेशन बंधनकारक आहे. मात्र, पोलीस व्हेरिफिकेशन करताना त्यांच्यावर महाराष्ट्रात काही गुन्हे दाखल आहेत का? याची पाहणी केली जाते. परराज्यात त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत का? हे पाहण्याची कोणतीही यंत्रणा सध्या अस्तित्वात नाही. यासंदर्भात एक राष्ट्रीय डेटा करण्याचे काम क्रेंदीय पातळीवर सध्या सुरू आहे. मात्र, त्याला आणखी एक वर्ष लागण्याची शक्‍यता आहे. यामुळे खबरदारी म्हणून सुरक्षा एजन्सींना आता कर्मचारी मूळ ज्या राज्यातील रहिवाशी आहे. त्या राज्यातील पोलीस व्हेरिफिकेशनही बंधनकारक करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button