breaking-newsपिंपरी / चिंचवड
आगीत रद्दीचा टेम्पो जळाला

पिंपरी – रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या रद्दीच्या टेम्पोला आग लागून टेम्पो जळून खाक झाला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास वाकड येथे घडली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकले नाही.
वाकड येथील साई चौकात शुक्रवारी रात्री टेम्पो (एमएच-14-सीडी-7332) उभा होता. यामध्ये रद्दी भरलेली होती. मध्यरात्री दीडच्या सुमारास या टेम्पोला आग लागली. आगीची माहिती मिळताच रहाटणी आणि संत तुकारामनगर येथील अग्निशामक मुख्यालयातून बंब घटनास्थळी पोहोचले. टेम्पो रद्दीने भरला असल्याने आग आटोक्यात येत नव्हती. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.