breaking-newsपिंपरी / चिंचवड

बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सांगवी – भरधाव बसची धडक बसून गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना नुकतीच सांगवी फाटा येथे दुपारी एक वाजता घडली.

वत्सलाबाई किसन सायकर (वय-65, रा. बाणेर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा राजेंद्र सायकर यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात बस चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वत्सलाबाई सायकर या सांगवी फाटा येथे रस्ता ओलांडत असताना, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करत, बस चालवून अज्ञात चालकाने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या सायकर यांचा उफचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातानंतर बस चालक न थांबता निघून गेला. सांगवी पोलीस तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button