breaking-newsपिंपरी / चिंचवड

देहुरोडला वर्चस्वातून पुन्हा राडा

  • नागरिकांमध्ये घबराट : चार पोलिसांसह दोन होमगार्ड जखमी
  • दुचाकी, दोन “एटीएम’ची तोडफोड
  • 80 जणांवर गुन्हा दाखल; 22 जण अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी

देहुरोड – येथील पारशीचाळ येथे शुक्रवारी (दि. 26) रात्री वर्चस्वासाठी पुन्हा राडा झाला. जमलेल्या जमावाने केलेल्या दगडफेकीत, लोखंडी रॉड, लाठ्याच्या हल्यात दोन “एटीएम’च्या काचा फोडल्या. दोन दुचाकीची तोडफोड करण्यात आली. या राडेबाजीमध्ये चार पोलिसांसह दोन होमगार्ड जखमी झाले. या प्रकरणी पोलिसांनी सुमारे 80 ते 90 जणांवर गुन्हा दाखल करीत पाच अल्पवयीन ताब्यात घेत 22 जणांना अटक केले. अटक आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची बुधवारपर्यंत (दि. 30) पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत अल्पवयीन गुन्हेगार सुभान शेख याच्या समर्थकांनी गुरूवारी (दि. 25) फटाके वाजवित सुभानचा वाढदिवस साजरा केला. त्याच्या मारेकऱ्यांना परिसरात वर्चस्वासाठी वाहनांची तोडफोड करीत दहशत माजविल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते. तोकडी पोलीस संख्या असतानाही देहुरोड पोलिसांनी होमगार्डच्या मदतीने ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात केला होता. शुक्रवारी रात्री पुन्हा टोळळ्यांनी दहशत माजवित पसार झाले. मात्र त्याचवेळी परिसरातील दुसऱ्या टोळक्‍यांनी वर्चस्व राखण्यासाठी जमावातून दगडफेक केली. लाठ्या, हॉकीस्टिक, लोखंडी रॉडने तोडफोड करीत दहशत माजवली.

दोन “एटीएम’च्या काचा फोडत 2 दुचाकीची तोडफोड करून नुकसान केले. त्यावेळी प्रतिकार करताना झालेल्या दगडफेकीत पोलीस हवालदार अशोक नवले, पोलीस नाईक सचिन भागवत, बाळासाहेब सावंत, चालक पाटील यासह 2 होमगार्ड जखमी झाले. जमावाचा वाढत्या उद्रेकाला आटोक्‍यात आणले.

पोलीस उपविभागीय अधिकारी गणपतराव माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे विभागाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज पवार यासह सुमारे 12 अधिकारी, 40 तळेगाव पोलिसांसह स्थानिक पोलीस, होमगार्डच्या मदतीने कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या या कारवाईमध्ये 80 ते 90 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. 55 संशयितांची नावे निष्पन्न झाली. दोन गटातील 55 पैकी 22 जणांना अटक करण्यात आली तर पाच अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपींना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

आतापर्यंतच्या घटनेतील पोलिसांनी केलेली सर्वात मोठी कारवाई आहे. अन्य संशयिताचा शोध घेत आहे. पारशीचाळ परिसरात तणावपूर्ण वातावरण असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button