breaking-newsपुणेमहाराष्ट्र

शहरात डासांचा प्रादुर्भाव वाढला

  • पाण्यात आळ्या सापडल्याने पालिकेने भरले दोन जणांवर खटले तर 127 जणांना नोटीसा

पुणे – शहरात सध्या पाऊस होऊन गेल्यानंतर साचलेल्या खडड्यांमध्ये, घराच्या परिसरात, घरांमध्ये डासांची उत्त्पत्ती होताना दिसत असून सर्वत्र डासांचा प्रादूर्भाव वाढल्याचे दिसत आहे. याबाबत पालिकेने आतापर्यंत दोन महिन्यात दोन जणांवर चक्‍क खटलेच भरले आहेत. तर बाराशे रुपयांचा दंडही वसूल केला आहे. तर गेल्या महिन्याभरात 127 जणांना नोटीस बजावली आहे.
शहरात सध्या डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणावर नसली तरी शहरात सर्वत्र डासांची संख्या वाढल्याचे दिसत आहे. दिवसा असणाऱ्या डासांबरोबर रात्रीच्या वेळीही डासांची संख्या वाढलेली दिसत आहे.
दरम्यान याबाबत पालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वावरे म्हणाले, पालिकेने याबाबत सर्व शासकीय कार्यालयांना, अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच जनजागृतीपर स्टिकर्स, पोस्टर्सही लावण्यात आले आहे. डासांमुळे होणारा प्रादुर्भाव हा मानवनिर्मित आजार आहे. त्यामुळे नागरिकांनीच हा होऊ नये याची काळजी घेणे आवश्‍यक आहे. नागरिकांनी पाऊस झाल्यानंतर गच्चीवर, बाल्कनी, कुंडी, घरांमधील फ्लॉवरपॉट आदी सर्व गोष्टी तपासल्या पाहिजेत. कोठेही स्वच्छ अथवा घाण पाणी साठून रहाता कामा नये याची खबरदारी घेतली पाहिजे.

पालिकेच्या वतीने डास आढळतील त्या ठिकाणी औषध फवारणी सुरु आहे. मात्र याबाबत नागरिकांनीच खबरदारी घेण्याची अधिक गरज आहे. याबाबत आतापर्यंत दोन महिन्यात आम्ही दोन जणांवर डांसाच्या आळ्या सापडल्याप्रकरणी खटला भरला आहे. तर दोन महिन्यात 127 जणांना नोटीसाही पाठविल्या आहेत.
डॉ.संजीव वावरे, सहायक आरोग्य अधिकारी
पुणे मनपा आरोग्य विभाग

आकडेवारी
जानेवारीपासून सापडलेले डेंग्यूचे संशयित – 289
जानेवारीपासून प्रत्यक्ष डेंग्यू झालेले रुग्ण – 42
जानेवारी महिन्यापासून सापडलेले चिकुनगुनियाचे रुग्ण – 14
जानेवारीपासून नागरिकांना पाठविलेल्या नोटीसा – 129

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button