breaking-newsआंतरराष्टीय

शंभर भारतीय घुसखोरांना अमेरिकेत पकडले

वॉशिंग्टन – अमेरिकेच्या दक्षिणेकडील न्यु मेक्‍सिको मधून अमेरिकेत बेकायदेशीरपणे घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुमारे शंभर भारतीय नागरीकांना तेथे पकडण्यात आले असून त्यांना तेथील डिटेंशन सेंटर मध्ये ठेवण्यात आले आहे. हे निर्वासित भारतीय बहुतांशी पंजाब प्रांतातील असून त्यात शीख आणि ख्रिश्‍चन नागरीकांचा भरणा आधिक आहे. ओरेगॉन आणि न्यु मेक्‍सिको येथील डिटेंशन सेंटर मध्ये त्यांना ठेवण्यात आले असून त्यांच्याशी अमेरिकेतील भारतीय दूतावासाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दोन भारतीय नागरीकांशी अधिकाऱ्यांना संपर्क साधण्यात यश आले असून त्यांच्या समस्येवर उपाययोजना केली जात आहे. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी ओरेगॉन येथील डिटेंशन सेंटरला भेट देऊन तेथील भारतीय नागरीकांशी चर्चा केली आहे. तेथील स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत अशी माहिती भारतीय दूतावासातर्फे देण्यात आली आहे. डिटेंशन सेंटर मधील लोकांनी अमेरिकेत राजाश्रय मिळण्यासाठी अर्ज केले आहेत. आम्हाला आमच्या देशात हीन वागणूक दिली जात असून आम्हाला तेथे अत्याचारही सहन करावे लागत आहेत असे कारण देऊन त्यांनी अमेरिकेत राजकीय आश्रय मागितला आहे. तथापी बेकायदेशीर घुसखोरीच्या आरोपातून सुटण्यासाठी सर्वच स्थानबद्ध लोक अशी भूमिका घेत असतात असे सांगितले जात आहे.

अमेरिकन पंजाबी असोशिएशनचे अध्यक्ष सतनामसिंग चहल यांनी सांगितले की हजारो भारतीय नागरीक अमेरिकन तुरूंगात गेले अनेक दिवस खितपत पडले आहेत यातील बहुतांशी पंजाबी आहेत. सन 2013 पासून जी महिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार सुमारे 27 हजार भारतीय नागरीकांना अमेरिकेच्या सीमावर्ती भागात बेकायदेशीर घुसखोरी केल्याच्या प्रकरणात पकडण्यात आले आहे त्यात चार हजार महिला आणि 350 लहान मुले आहेत अशीही माहिती मिळाली आहे.

चहल म्हणाले की पंजाब मधील असंख्य युवकांना बेकायदेशीरपणे अमेरिकेत घुसण्यास मदत करण्याचे काम काहीं एजंट मंडळी करीत असून 35 ते 40 लाख रूपये घेऊन पंजाबी युवकांना अमेरिकेत घुसवले जात आहे. हे प्रकार बंद झाले पाहिजेत असे ते म्हणाले. मानवी तस्करीला भारतीय राजकारण्यांनीच आळा घालण्याची गरजही त्यांनी व्यक्‍त केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button