breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
आषाढी एकादशीनिमित्त गॅलक्सी क्लिनिकच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
पिंपरी-आषाढी एकादशीचे औचित्य साधून तसेच गॅलक्सी क्लिनिकच्या द्वितीय वर्धापनदिनानिमित्त कासारवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबीर सोमवारी (दि.23 जुलै) कासारवाडी मनपा शाळेसमोरील शेळके अपार्टमेंट येथे सकाळी 9 ते दुपारी 12 या वेळेत होणार आहे. मोफत सुविधांचा लाभ घेण्यासाठी 10 रुपयांचे माफक शुल्क भरून नावनोंदणी करणे आवश्यक असून तपासणीसाठी उपाशी पोटी येण्याचे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. तसेच या शिबिरात नाव नोंदविण्यासाठी 9850111201 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
या शिबिरामध्ये रक्त शर्करा तपासणी, हिमोग्लोबिन तपासणी, हाडांची धनता तपासणी, मुख कर्करोग तपासणी, रक्तदाब तपासणी इत्यादी तपासणी मोफत करण्यात येणार आहेत. तर थायरॉईड तपासणी, स्वाईन फ्लू लस, स्तन कर्करोग तपासणी, गर्भाशय कर्करोग तपासणी, प्रोस्टेट कर्करोग तपासणी या तपासण्या अत्यंत माफक दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
या शिबिराचे आयोजन डॉ. महेश शेटे आणि डॉ. सुप्रिया शेटे यांनी केले असून या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.