पिंपरी / चिंचवड

असोसिएशन ट्रान्सपोर्ट ऑफ इंडियाच्या चक्काजाम आंदोलनाला महाराष्ट्र मजदूर संघटनेचा पाठिंबा

पिंपरी – संपूर्ण देशभरात आजपासून माल वाहतूकदारांनी देशव्यापी बेमुदत चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाचे पडसाद पिंपरी-चिंचवड शहरातही उमटले असून असोसिएशन ट्रान्सपोर्ट ऑफ इंडियाच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने निगडीत चक्काजाम आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला महाराष्ट्र मजदूर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इरफान सय्यद यांनी पाठिंबा दिला.

 

निगडीतील मुख्य चौकात झालेल्या या आंदोलनामध्ये असोसिएशन ऑफ ट्रान्सपोर्ट, पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष अमित धुमाळ, कार्याध्यक्ष प्रमोद भावसार, चेअरमन राधेश्याम अग्रवाल, अशोक काळे, के. सी. शर्मा, आर. के. गुप्ता, आर. के. तायाल, जगराम चौधरी, विनोद शर्मा, प्रीतम सिंघ, राजेंद्र मालू, राजकुमार फडतरे, शांतिलाल ओसवाल, मंगलसिंघ धिल्लोन, महाराष्ट्र मजदूर संघटनेचे पदाधिकारी परेश मोरे, प्रवीण जाधव, भिवाजी वाटेकर, मुरली कदम, खंडु गवळी, किसन बावकर, पांडुरंग कदम, सर्जेराव कचरे, गोरक्ष बांगर, सतीष कंठाळे, शंकर मदने, गोरक्षनाथ दुबाले, बबन काळे, ज्ञानदेव पाचपूते, सापते, अशोक सालूंके, जोगिंदर शर्मा, ओमकार माने, समर्थ नाइकवाडे आदी उपस्थित होते.

 

आपल्या विविध मागण्यांसाठी मालवाहतूकदारांच्या संघटनांनी गुरुवारी मध्यरात्रीपासून आंदोलनाला सुरुवात केली.  या आंदोलनात महाराष्ट्रातील ट्रक चालक, मालक, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सहभागी झाले आहेत. हे चक्काजाम आंदोलन यशस्वी झाल्यास जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. डिझेल दरवाढ कमी करून सर्व राज्यात समान किंमत ठेवणे, टोलमुक्त भारत संकल्पना राबवावी, थर्ड पार्टी इन्शुरन्स वाढीवर नियंत्रण ठेवणे आणि आरटीओ, पोलीस आणि सीटीओ यांच्याकडून महामार्गावर होणारी छळवणूक थांबवावी या मालवाहतूकदार संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button