breaking-newsराष्ट्रिय

पीएमसी बँकेच्या खातेदारांना दिलासा; रिझर्व्ह बँकेने पैसे काढण्याची मर्यादा वाढवली

पंजाब आणि महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या (पीएमसी) ग्राहकांना दिलासा देणारे वृत्त आहे. कारण, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेच्या खातेधारकांना पैसे काढण्याची मर्यादा वाढवली असून त्यानुसार ५०,००० रुपये आपल्या खात्यातून त्यांना काढता येणार आहेत. यापूर्वी ही मर्यादा ४०,००० रुपये इतकी होती.

ANI@ANI

Reserve Bank of India enhances withdrawal limit for depositors of Punjab and Maharashtra Cooperative (PMC) Bank Limited to Rs 50,000.

View image on Twitter

१६४५:०८ म.उ. – ५ नोव्हें, २०१९Twitter वरील जाहिराती विषयक माहिती आणि गोपनीयता३९ लोक याविषयी बोलत आहेत

यासंदर्भात आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले की, पीएमसी बँकेच्या तरलतेच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच बँकेची आपल्या खातेधारकांना पैसे देण्याची क्षमता तपासून पैसे काढण्याची मर्यादा ४०,००० रुपयांवरुन ५०,००० रुपये करण्यास परवानगी देण्यात आली आहे. आरबीआयच्या या नव्या आदेशानंतर आता बँकेच्या सुमारे ७८ टक्के खातेधारकांना आपल्या खात्यातून संपूर्ण रक्कम काढून घेता येणे शक्य होणार आहे.

त्याचबरोबर खातेधारकांना पीएमसी बँकेच्याच एटीएममधूनही ही ५०,००० रुपयांपर्यंतची रक्कम काढण्यासही परवानगी देण्यात आली आहे. पैसे काढण्यात खातेधारकांना अडचणी येऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे आरबीआयने सांगितले आहे. पीएमसी बँकेच्या स्थितीचे आम्ही जवळून निरिक्षण करीत असून भविष्यात खातेधारकांच्या पैशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाची पावले उचलेल, असेही आरबीआयने स्पष्ट केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button