ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्र
आळंदी देवस्थानच्या विश्वस्तपदी योगी निरंजननाथ, डॉ.भावार्थ देखणे, ॲड. राजेंद्र उमाप यांची नियुक्ती
. पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी या नेमणुकांबाबत दिला आदेश
आळंदी : आळंदी देवस्थानच्या विश्वस्त पदाच्या सहा रिक्त जागांसाठी इच्छुक अर्जदारांच्या मुलाखती होऊन तीन जणांची नेमणूक करण्यात आली आहे. यात डॉ. भावार्थ देखणे, ॲड. राजेंद्र उमाप, योगी निरंजननाथ या तिघांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. पुण्याचे प्रमुख जिल्हा न्यायाधीश के.पी. नांदेडकर यांनी या नेमणुकांबाबत आदेश दिला.
ही नेमणूक सात वर्षांसाठी असेल. कार्तिकी वारी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार असल्याने नवीन विश्वस्त कोण याची उत्सुकता होती. जिल्हा न्यायाधीश शाम चांडक आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी मुलाखती घेतल्या होत्या. या जागा मे महिन्यात रिक्त झाल्या होत्या. जवळपास सव्वाशे लोकांनी अर्ज केले होते. त्यातून केवळ तीन जागांवरच नेमणुका झाल्या.