FIFA World Cup 2026 : भारत विरूद्ध कतार यांच्यात आज सामना; कुठे पाहता येणार सामना?

FIFA World Cup 2026 : भारतीय फुटबॉल संघासाठी आजचा दिवस मोठा आहे. २०२६ फिफा विश्वचषक पात्रता फेरीतील पहिल्या सामन्यात कुवेतचा १-० असा पराभव केल्यानंतर संघ आता कतारविरुद्ध मैदानात उतरणार आहे. भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर होणारा हा सामना संघाला कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल. ग्रुप अ मधील भारतासमोरील हे सर्वात कठीण आव्हान आहे.
अ गटात भारत आणि कतार व्यतिरिक्त कुवेत आणि अफगाणिस्तानचे संघ आहेत. गटातील अव्वल दोन संघ फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीसह २०२७ AFC आशियाई चषक स्पर्धेत आपली जागा निश्चित करतील. भारतीय संघ एकदाही फिफा विश्वचषक पात्रता फेरीच्या तिसऱ्या फेरीपर्यंत पोहोचू शकलेला नाही. भारत आणि कतार यांच्यात आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. कतारने दोन सामने जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
हेही वाचा – Pune : हातात कोयते आणि बंदुक घेऊन मद्यविक्री दुकानावर दरोडा
अशातच आता फिफा विश्वचषक २०२६ पात्रता फेरीच्या पहिल्या सामन्यात कुवेतला पराभूत केल्यानंतर, भारताचे डोळे आता कतारसोबतच्या पुढील सामन्याकडे लागले आहेत. चार दिवसांपूर्वी क्वालिफायर फेरीच्या पहिल्या सामन्यात भारताने कुवेतला त्यांच्याच भूमीवर ९-० ने पराभूत केले. भारतीय संघ आत्मविश्वासाने भरलेला दिसतो आणि आज आशियाई चॅम्पियन कतारविरुद्ध आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारत आणि कतार यांच्यातील सामन्याची सविस्तर माहिती :
सामना कधी आहे?
आज मंगळवार, २१ नोव्हेंबर २०२३ रोजी खेळवला जाणार आहे.
सामना कुठे आहे?
सामना भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
सामना किती वाजता सुरू होईल?
सामना संध्याकाळी ७.०० वाजता सुरू होणार आहे.
टीव्हीवर सामना कोठे पाहता येणार?
सामना स्पोर्ट्स १८ १, स्पोर्ट्स १८ १ HD आणि स्पोर्ट्स १८ ३ वर थेट प्रक्षेपित केला जाईल.
सामना मोबाईलवर कुठे पाहता येणार?
सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ सिनेमा अॅपवर पाहता येणार आहे.