breaking-newsपुणे

रेडिओ दुर्बीण : 2025 पर्यंत पूर्ण होणार उभारणी

पुणे – स्क्वेअर किलोमीटर ऍरे (एसकेए) हा प्रकल्प म्हणजे एक दुर्बीण नसून अनेक दुर्बिणींचा समूह आहे. ही रेडिओ दुर्बीण सध्याच्या इतर रेडिओ सुविधापेक्षा 200 पटीने अधिक क्षमतेने आकाशातील घटकांचे संशोधन करू शकणार आहे.

या प्रकल्पांतर्गत 300 दुर्बिणी व सुमारे 30 हजार अँटेना उभारले जाणार आहेत. त्यामुळे विश्‍वाबद्दलचे रहस्य, माहिती सखोलपणे अभ्यासणे, तसेच भौतिकशात्रातील मूलभूत सिद्धांत समजण्यास मदत होणार आहे.

पुढील वर्षीपासून या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचे काम सुरू होणार असून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पामध्ये भारतासह 12 देशांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button